• Download App
    Doctors' licenses will be suspended if they don't prescribe generic drugs

    जेनेरिक औषधी न लिहिल्यास डॉक्टरांचे परवाना होणार निलंबित, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नवीन नियमावली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शनवर फक्त जेनेरिक औषधे लिहावी लागणार आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या नियमावलीनुसार डॉक्टरांनी जेेनेरिक औषधी न लिहून दिल्यास त्यांचा परवाना काही काळासाठी निलंबित केला जाईल.  Doctors’ licenses will be suspended if they don’t prescribe generic drugs

    आयोगाने म्हटले आहे की, देशातील लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा आरोग्यावर खर्च करतात, ज्यामध्ये मोठी रक्कम फक्त औषधांवर खर्च केली जाते. ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे ३० ते ८०% स्वस्त असतात. जेनेरिक औषधे लिहून दिल्यास खर्च कमी होईल.


    रुग्णांनी गैरवर्तन केल्यास उपचार नाकारू शकतील डॉक्टर; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जारी केले नियम


    २ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक आचारसंहितेनुसार, डॉक्टरांनी ब्रँडेड जेनेरिक औषधे लिहून देणेदेखील टाळावे. नोंदणीकृत डॉक्टरांनी जेनरिक नावाने औषध लिहून द्यावे, नियमांचे उल्लंघन झाल्यास डॉक्टरांना नियमांबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला जाईल किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी प्रशिक्षणास उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते.

    वारंवार उल्लंघन केल्यास परवाना काही काळासाठी निलंबित केला जाऊ शकतो. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (आयएमसी) २००२ मध्ये जारी केलेल्या नियमावलीनुसार सध्याही डॉक्टरांना जेनेरिक औषधे लिहून द्यावी लागतात. मात्र, त्यात दंडात्मक कारवाईचा उल्लेख नाही. त्यामुळे आयोगाने जारी केलेल्या नियमावलीमध्ये ती तरतूद करण्यात आली.

    Doctors’ licenses will be suspended if they don’t prescribe generic drugs

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला