• Download App
    लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A आघाडीत बिघाडी; ममता बॅनर्जींनी केली 'ही' मोठी घोषणा!|Disruption in I.N.D.I.A Alliance Ahead of Lok Sabha Elections Mamata Banerjee made big announcement

    लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A आघाडीत बिघाडी; ममता बॅनर्जींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

    सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले त्यामुळे त्यांनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडी म्हणजे म्हणजेच विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात एकट्याने आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. याआधी ही बातमी समोर आली होती की TMC ने काँग्रेसला केवळ 2 जागांवर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.Disruption in I.N.D.I.A Alliance Ahead of Lok Sabha Elections Mamata Banerjee made big announcement



    2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A आघाडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांनी दावा केला की त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले त्यामुळे त्यांनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे.

    ‘I.N.D.I.A ‘ आघाडीला हा मोठा झटका मानला जात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या आघाडीत सर्व काही सुरळीत चाललेले नाही हे यावरून स्पष्ट झालं आहे.. ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीत फूट पडू शकते, असे मानले जात आहे.

    India alliance 28 राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तयार केले होते. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय रोखू, असा दावा या पक्षांनी केला होता, मात्र निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहेत आणि आताच यांच्याती मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

    Disruption in I.N.D.I.A Alliance Ahead of Lok Sabha Elections Mamata Banerjee made big announcement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित