• Download App
    लतादीदींच्या स्मारकावर महाराष्ट्रात वाद; मात्र मध्य प्रदेशात इंदूरमध्ये त्यांच्या नावाने संगीत अकादमी, महाविद्यालय संग्रहालय उभारणार!! । Dispute in Maharashtra over Latadidi's memorial; But in Madhya Pradesh, a music academy and a college museum will be set up in his name in Indore !!

    लतादीदींच्या स्मारकावर महाराष्ट्रात वाद; मात्र मध्य प्रदेशात इंदूरमध्ये त्यांच्या नावाने संगीत अकादमी, महाविद्यालय संग्रहालय उभारणार!!

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारक उभारण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांचे नेते आमने-सामने आले असताना मध्य प्रदेशात इंदूरमध्ये लतादीदींच्या नावाने संगीत अकादमी महाविद्यालय आणि भव्य संग्रहालय उभारण्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. Dispute in Maharashtra over Latadidi’s memorial; But in Madhya Pradesh, a music academy and a college museum will be set up in his name in Indore !!

    मुंबईत लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जिथे झाले त्या शिवतीर्थावर स्मारक उभारावे, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त करत लतादीदींचे स्मारक उभे करणे सोपे नाही. त्यासाठी देशाला विचार करावा लागेल, असे म्हटले आहे. त्यामुळे लतादीदींच्या स्मारकाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेनेचे नेते आमने-सामने आल्याचे मानले जात आहे.



    महाराष्ट्रात हे घडत असताना मध्यप्रदेशात इंदूर इंदूरमध्ये लतादीदींच्या पुतळा उभा करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. एवढेच नाही तर लतादीदींच्या नावाने संगीत अकादमी स्थापन करून महाविद्यालय सुरू करून तेथेच लतादीदींच्या संगीत योगदानाविषयी भव्य संग्रहालय उभे करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला होता. त्यांच्या जन्मगावी त्यांच्या नावाने संगीत अकादमी, महाविद्यालय संग्रहालय उभे करणे हे मध्यप्रदेश शासनाचे कर्तव्य आहे, असे शिवराज सिंग चौहान म्हणाले.

    भोपाळ स्मार्ट सिटी प्रकल्पात लतादीदींच्या स्मरणार्थ शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. त्यावेळी भोपाळमधील संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर आणि हजारो संगीत प्रेमी उपस्थित होते.

    Dispute in Maharashtra over Latadidi’s memorial; But in Madhya Pradesh, a music academy and a college museum will be set up in his name in Indore !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला