• Download App
    कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालापेक्षा मतपेटीतील चिठ्ठ्या अन् पैशांचीच चर्चा । Discussion on the writeen notes and money found in the ballot box rather than the result of Kolhapur District Bank election

    कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालापेक्षा मतपेटीतील चिठ्ठ्या अन् पैशांचीच चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालापेक्षा मतपेटीतील चिठ्ठ्या अन् पैशांचीच चर्चा आज अधिक रंगली आहे.  मतदारांनी उमेदवारांना उद्देशून विविध सूचना केल्या आहेत. त्यामुळे निकालापेक्षा या सूचनांची चर्चा मतदान केंद्रावर चांगलीच रंगली. Discussion on the writeen notes and money found in the ballot box rather than the result of Kolhapur District Bank election

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. मात्र निकाला आधीच अजब प्रकार समोर आला. मतपेटी मतदारांच्या चिठ्या आणि पैसे सापडले आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत.



    ‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा… आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर आगपाखड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.‘उद्यापासून समरजितदादा सर्वसामान्य लोकांची डोकी फोडण्यासाठी तालुका फिरायला मोकळे’, असे एका चिठ्ठीत लिहिले आहे. मतपेटीत टाकलेले पन्नास रुपये सापडले.

    आतापर्यत हाती आलेल्या निकालानुसार विकास सेवा संस्थातून पाच उमेदवार विजयी झाले आहेत. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा ४७ मतांनी विजयी झाला आहे. त्यांना ९८ मते मिळाली. विरोधी गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाली. तर, पन्हाळा गटातून आमदार विनय कोरे विजयी झाले आहेत. शाहूवाडी विकास संस्था गटातून रणवीर मानसिंगराव गायकवाड. आजरा गटातून राष्ट्रवादीचे सुधीर देसाई, गडहिंग्लज संतोष पाटील विजयी झाले आहेत.

    Discussion on the writeen notes and money found in the ballot box rather than the result of Kolhapur District Bank election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!