भाजपचे ज्येष्ठ नेते हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केला आहेा. भाजपाने उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. Dinesh Sharma declared candidature for Rajya Sabha seat from BJP
नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली होती आणि राज्यसभेसाठी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने दिनेश शर्मा यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी २६ जून रोजी दिल्लीत निधन झाले. आग्रा येथील रहिवासी असलेल्या हरिद्वार दुबे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिसूचनेनुसार, पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर आहे. 6 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून 8 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
Dinesh Sharma declared candidature for Rajya Sabha seat from BJP
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!
- आधी पोलिसांवर दगडफेक, 12 पोलीस जखमी, त्यानंतर जालन्यात लाठीमार; फडणवीसांचा स्पष्ट खुलासा
- Aditya-L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘ISRO’ आज लॉन्च करणार ‘आदित्य एल 1’; जाणून घ्या वेळ