• Download App
    डिजिटल पेमेंटची देशामध्ये उंच भरारी, छोट्या टपरीपासून मोठ्या स्टोअर्सपर्यंत। Digital payments soar in the country, From small Shops to large stores

    डिजिटल पेमेंटची देशामध्ये उंच भरारी, छोट्या टपरीपासून मोठ्या स्टोअर्सपर्यंत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंट व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. अगदी चहा, किराणा मालाच्या दुकानापासून मोठ्या स्टोअर्समध्ये डिजिटल पेमेंट सूचनांचे फलक झळकत आहेत. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच पाच वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांची वाढ झाली आहे. Digital payments soar in the country, From small Shops to large stores

    गुगल पे, पेटीएम, फोन पे आणि भीमसारख्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला १२२ कोटीची देवाणघेवाण होत आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला तर या डिजिटल व्यवहारात ५५०टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१६-१७मध्ये १००४ करोड डिजिटल व्यवहार झाले होते. हा आकडा २०२० – २१ मध्ये ५५५४ कोटीपर्यंत पोचला आहे. २१ च्या एप्रिल-मे महिन्यात डिजिटल व्यवहाराचा आकडा २०२० च्या तुलनेत १०० टक्के जास्त वाढला आहे. क्यूआर कोडने यूपीआय पेमेंटची सुविधा आहे. याशिवाय आता ग्राहकांना अनेक सुविधा देण्यावर काम सुरू आहे. पाच वर्षांमध्ये या तंत्रात आणखी बदल होणार आहे.



    पेटीएम अव्वल

    मोबाईल पेमेंटच्या दुनियेत सध्यातरी पेटीएम अव्वल आहे. अनेकांचा पेटीएम वापरण्याकडे कल आहे. पेटीएमकडे सुमारे एक कोटी 60 लाख व्यावसायिक आस्थापनांनी पेमेंट भागीदारी केली आहे.

    भविष्यात तंत्रज्ञानात होतील बदल

    • बायोमेट्रीक तंत्र – ज्याप्रमाणे आपण स्मार्टफोन अंगठा दाखवून अनलॉक करतो त्याचप्रमाणे फिंगर प्रिंट टेक्नॉलॉजीचा वापर पेमेंट जगतात करण्याचा प्रयत्न आहे. ब्रिटनमधील काही बँका प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रीक कार्ड जारी करत आहेत.
    • आवाज हीच ओळख – अमेझॉन आणि गुगल पेसारख्या पंपन्या व्हॉईस पेमेंटचा प्रयोग करत आहेत. सध्या अमेरिकेत यावर काम सुरू आहे.
    • टॅप अँड गो पेमेंट – फक्त आपल्या पेमेंट कार्डाला मशीनमध्ये टॅप करायचे आणि जायचं. इतपं सोपं तंत्र जगभरात वेगाने पसरत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्हिसा, मास्टर कार्ड आणि एनपीसीआयला ‘टॅप अँड गो पेमेंट’ला मंजुरी दिली आहे.
    • चेहऱ्याची जादू – चेहऱ्याचा वापर करणारे फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर चीनसारख्या देशात सुरू झाला आहे.

    Digital payments soar in the country, From small Shops to large stores

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य