• Download App
    दीदी, आम्ही बाहेरचे नाही, मी सांगतो कोण बाहेरचे आहेत ते...; अमित शहांचे ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर|Didi, we are not outsiders, I say who are outsiders ...; Amit Shah's reply to Mamata Banerjee

    दीदी, आम्ही बाहेरचे नाही, मी सांगतो कोण बाहेरचे आहेत ते…; अमित शहांचे ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था

    नागरकाटा :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना बाहेरचे म्हणजे गुजराती असे संबोधतात… त्याला अमित शहांनी आज नागरकाटा येथील सभेत प्रत्युत्तर दिले.Didi, we are not outsiders, I say who are outsiders …; Amit Shah’s reply to Mamata Banerjee

    अमित शहा म्हणाले, की दीदी, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि मला बाहेरचा म्हणता ना… हरकत नाही… पण दीदी, मी तुम्हाला सांगतो बाहेरचे कोण आहे ते… कम्युनिस्टांचे साम्यवादी तत्त्वज्ञान आहे ना… ते बाहेरचे आहे. ते रशिया आणि चीनमधून त्यांनी आणले आहे…



    काँग्रेसचे नेतृत्त्व बाहेरचे आहे. ते त्यांनी इटलीहून आणले आहे… आणि दीदी, तुमच्या तृणमूळची व्होट बँक बाहेरची आहे. ते घुसखोर आहेत, अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिले.गुरखा आणि नेपाळींना कोणी त्रास दिला तर त्याच्याशी लढायला भाजप समर्थ असल्याची ग्वाही अमित शहांनी दार्जिलिंगच्या जाहीर सभेत दिली.

    ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन

    अमित शहांनी आज ममतांना प्रत्युत्तर दिले असले, तरी ममतांचे आज कुठेही भाषण नव्हते. कारण निवडणूक आयोगाने त्यांच्यावर काल रात्री ८.०० ते आज रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचारबंदी लादली आहे. धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागतिल्यावरून दोषी ठरवून

    ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचार करण्यावर बंदी घातली आहे. पण आता या बंदीच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी या कोलकात्याच्या गांधी मूर्तीपाशी धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. पण त्यांनी आज कोणतेही भाषण केलेले नाही.

    Didi, we are not outsiders, I say who are outsiders …; Amit Shah’s reply to Mamata Banerjee

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??