माजी मुख्यमंत्री चन्नींच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसला सवाल!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेसने 1962, 1965 आणि 1971 ची लढाई निवडणूक जिंकण्यासाठी आयोजित केली होती का, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी केला.Did Congress organize war to win elections Anurag Thakurs question to Congress
चरणजितसिंग चन्नी यांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “माझा काँग्रेस पक्षाला प्रश्न आहे. 1962चे युद्ध, 1965चे युद्ध, 1971चे युद्ध काँग्रेसने निवडणुका जिंकण्यासाठी केले होते का. अशा विधानासाठी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. हे आपल्या सैन्याला प्रश्न विचारतात. जेव्हा चिनी सैन्याने डोकलामध्ये घुसखोरी केली होती, तेव्हा आपल्या सैन्याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. तेव्हा राहुल गांधी कुठं होते?
दरम्यान भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी आरोप केला की, “जेव्हा भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक केले, तेव्हा काँग्रेसचे लोक हे स्ट्राइक खोटे असल्याचे सांगत राहिले. ते आमच्या लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आजच्या वक्तव्याशिवाय महाराष्ट्रात. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात दिलेल्या विधानासाठी देखील त्यांनी माफी मागितली पाहिजे, असंही ठाकूर म्हणाले.
Did Congress organize war to win elections Anurag Thakurs question to Congress
महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांच्या डोळ्यातून अश्रुधारा, अश्रू सुकले सुप्रियांच्या डोळा, अजितदादांच्या भाषणातून बरसल्या नक्कलेच्या धारा!!
- 10 मतदारसंघांमधला प्रचाराचा ताण, घसाही बसला; प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द!!
- ICC ने जाहीर केले महिला T20 विश्वचषक 2024चे संपूर्ण वेळापत्रक!
- ‘पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत…’ फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त विधान!