- देव देतो तेव्हा भरभरून देतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका गरीब मजुराला आला. ‘Diamond Day’ of the mining workers at Panna
- कृष्णा कल्याणपूरच्या एका उथळ हिरा खाणीमध्ये १३ कॅरेटचा एक मोठा हिरा सापडला. या हिऱ्याची किंमत तब्बल ६० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष प्रतिनिधी
पन्ना: मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) पन्नामध्ये(Panna) हिऱ्याचे मोठे भांडार आहे. या ठिकाणी अनेकदा हिरा सापडल्याच्या बातम्या समोर येतात.हिरा सापडल्यानंतर मजुराच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. एवढेच नाही तर आज सहा अन्य हिरेही सापडले आहे. त्यामुळे कालचा दिवस पन्नासाठी डायमंड डे ठरला. पन्नाच्या भूमीमधून नेहमीच सुंदर हिरे सापडतात. संपूर्ण जगामध्ये सुंदर क्वालिटीचे जेम हिरे येथेच सापडतात.
सोमवारी आदिवासी शेतकरी मुलायम सिंह याला १३ कॅरेटचा हिरा सापडला एकाच दिवशी चार मजुरांना हिरे मिळाले आहेत. दोघांना तीन मोठे हिरे आणि इतर दोघांना चार छोटे हिरे मिळाले आहेत.
दिवाळी सण जश्न-ए-रिवाज नाही,तेजस्वी सूर्या यांनी सूनवल्यावर फब इंडियाने मागे घेतली जाहिरात
13.54 कॅरेटचा हिरा सापडला
मिळालेल्या माहितीनुसार, पन्नातील रतनगर्भा परिसारील कृष्णा कल्याणपूर खाण परिसरात हे सर्व हिरे सापडले आहेत. मजुरांनी हे सर्व हिरे कार्यालयात जमा केले आहेत. हिरे कार्यालयातील अधिकारी अनुपम सिंह यांनी सांगितले की, राहुनिया गावचे रहिवासी मुलायम सिंह गौर यांना 13. 54 कॅरेटचा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. हा हिरा मौल्यवान आणि सर्वोत्तम दर्जाचा आहे.
मुलायम सिंह यांच्यासह पन्नाच्या एनएमडीसी कॉलनीत राहणाऱ्या रोहित यादवलाही हिरे सापडले आहेत, ज्यामध्ये 6 , 8 आणि 4.68 कॅरेटच्या हिऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, शिवराजपूर येथील शारदा विश्वकर्मा यांना दोन छोटे हिरे मिळाले आहेत. हे सर्व हिरे सध्या हिरे कार्यालयात जमा करण्यात आले असून आगामी लिलावात ठेवण्यात येणार आहेत.
लिलावानंतर रक्कम मिळेल
अनुपम सिंह यांनी सांगितले की, मजुरांनी जमा केलेले हिरे लिलावाद्वारे विकले जातील. विक्रीनंतर मध्य प्रदेश सरकारची 10 टक्के रॉयल्टी कापून उर्वरित रक्कम या गरीब मजुरांना दिली जाईल. 13.54 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत 60 लाखांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. एका अंदाजानुसार, रॉयल्टीची रक्कम कापूनही शेतकरी मुलायम सिंह यांना 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. ही केवळ अंदाजे रक्कम आहे, लिलावानंतरच खरी स्थिती कळेल. तर, इतर हिऱ्यांनाही लाखो रुपये किमत मिळण्याचा अंदाज आहे.
‘Diamond Day’ of the mining workers at Panna
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका रद्द करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
- अफ्सा कायदा देशावर काळा डाग, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याची नागालॅँड सरकारची मागणी
- धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर, आय एम बाबरी लिहिलेले बॅज विद्यार्थ्यांच्या खिशाला लावले
- पवार बनणार काँग्रेस आणि ममता यांच्यातला पूल?, की दोघांनाही देणार राजकीय हूल…??