प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून सत्य केलं उघड, जाणून घ्या कोण आहे उमेदवार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळणे ही कोणत्याही नेत्यासाठी मोठी गोष्ट असते. भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांकडून तिकीट मिळवण्यासाठी नेते वर्षानुवर्षे राजकारणात प्रयत्नशील असतात. मात्र त्यानंतरही त्यांना तिकीट मिळत नाही. परंतु , यावेळी अनेक जागांवरून असा किस्सा समोर येत आहे की, तिकीट मिळाल्यानंतर उमेदवारानेच निवडणूक लढविण्यास नकार दिला.Despite the refusal the Congress gave the ticket now the candidate refused to contest the election
बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपने भोजपुरी स्टार पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. पवन सिंह यांनी तिकीट मिळाल्याच्या एका दिवसानंतर निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. गुजरातमधून तिकीट मिळाल्यानंतर उमेदवाराने निवडणूक लढविण्यास नकार दिल्याची घटनाही समोर आली आहे. गुजरातमधील भाजप उमेदवार रंजन बेन आणि भिखाजी यांनी तिकीट मिळाल्यानंतर निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली होती. आता असेच एक प्रकरण काँग्रेसच्या गोटातून समोर आले आहे.
देशातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसने आपल्या ज्या नेत्याला लोकसभेचे तिकीट दिले होते, त्यांनी आता निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण राजस्थानच्या राजसमंद लोकसभा जागेशी संबंधित आहे. काँग्रेसने राजसमंदमधून सुदर्शन सिंह रावत यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. मात्र आता सुदर्शन सिंह रावत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
सुदर्शन सिंह रावत यांनी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासाराला पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. सुदर्शन सिंह रावत यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, मला लोकसभा निवडणूक लढवायची नाही, असे मी पक्षाच्या नेत्यांना आधीच सांगितले होते. मात्र त्यानंतरही मला तिकीट देण्यात आले. हे योग्य नाही.
Despite the refusal the Congress gave the ticket now the candidate refused to contest the election
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी संदेशखळी पीडितेला केला फोन, भाजपने बशीरहाटमधून दिली उमेदवारी
- कट्टर खालिस्तान विरोधी मुख्यमंत्री शहीद सरदार बेअंत सिंग यांचे नातू खासदार रवनीत सिंग बिट्टू भाजपमध्ये दाखल!!
- पूर्व आणि दक्षिणेतल्या राज्यांमधून खासदार संख्या वाढविण्याची भाजपला खात्री; पवार – ठाकरेंची फक्त महाराष्ट्रात 48 जागांमध्ये खेचाखेची!!
- पाकिस्तानच्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला; 4 दहशतवादी ठार, एक जवान शहीद; बलुच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी