• Download App
    कर्नाटकात सरकार असूनही काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार सापडेना!|Despite the government in Karnataka the Congress could not find a candidate to contest the Lok Sabha elections

    कर्नाटकात सरकार असूनही काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार सापडेना!

    राज्यातील अनेक मंत्र्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती यापूर्वीच फेटाळल्याचीही माहिती समोर


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इंडिया आघाडीच्या इतर पक्षांशी वेगवेगळ्या राज्यांतील जागांसाठी करार करत आहे. दिल्ली, गुजरात, हरियाणा, चंदीगड आणि गोव्यात आम आदमी पार्टी आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत जागावाटपाचा करार पक्षाने अंतिम केला आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये चर्चा सुरू आहे. पण काँग्रेसला त्यांचं सरकार असणाऱ्या कर्नाटकात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळत नसल्याचे दिसत आहे.Despite the government in Karnataka the Congress could not find a candidate to contest the Lok Sabha elections



    कर्नाटक हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे गृहराज्य आहे. सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, राज्यातील अनेक मंत्र्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती यापूर्वीच फेटाळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारमधील कोणताही मंत्री पद सोडून अनिश्चिततेच्या गर्तेत पडण्यास तयार नाही.

    2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने कर्नाटकात 25 जागा जिंकल्या. काँग्रेसला येथे केवळ एक जागा मिळाली. एचडी कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलरला (जेडीएस) एक जागा मिळाली. जेडीएस आता भाजपसोबत आहे. एक जागा भाजप समर्थित अपक्षांना गेली होती.

    2023 मध्ये कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय नोंदवला. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आपले नशीब बदलण्याची आशा काँग्रेसला आहे. मात्र पक्षाचे नेते सहकार्य करण्यास इच्छुक नाहीत.

    Despite the government in Karnataka the Congress could not find a candidate to contest the Lok Sabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या