वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आर्थिक संकटाच्या काळातही पाकिस्तानने अण्वस्त्रांचा साठा वाढवला आहे. पाकिस्तानकडे सध्या 170 अण्वस्त्रे असल्याचा अहवाल अमेरिकेच्या अणुशास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केला आहे. 2025 पर्यंत तो 200 च्या पुढे जाऊ शकतो. या अहवालाला ‘2023 पाकिस्तान न्यूक्लियर हँडबूक’ असे नाव देण्यात आले आहे.Despite being poor, Pakistan still has nuclear weapons; Increase in the number of nuclear bombs, 170 nuclear weapons are revealed in the US report
अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्सने 1999 मध्ये अंदाज व्यक्त केला होता की 2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 अण्वस्त्रे असतील. मात्र, पाकिस्तानने यापेक्षा जास्त अण्वस्त्रे बनवली आहेत.अमेरिकन एजन्सीने अनेक गुप्तचर दस्तऐवज, मीडिया आणि थिंक टँकच्या अहवालातून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांशी संबंधित डेटा गोळा केला आहे.
पाकिस्तानकडे 5 क्षेपणास्त्र तळ
पाकिस्तानच्या आण्विक क्षेपणास्त्र तळ आणि सुविधांची माहिती मिळू शकलेली नाही, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, सॅटेलाईट इमेजेसमध्ये पाकिस्तानचे 5 क्षेपणास्त्र तळ असल्याचे समोर आले आहे. तिथून ते आण्विक शस्त्रे ऑपरेट करू शकतात.
पाकिस्तान जमीन आणि समुद्रातून डागलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रांमध्ये सातत्याने बदल करत आहे. भारत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करत आहे, असेही अहवालात सांगण्यात आले आहे.
याला सामोरे जाण्यासाठी, पाकिस्तानने 2017 मध्ये जाहीर केले होते की त्यांनी एक मध्यम श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवले आहे त्यात अनेक वॉर हेड लावले जाऊ शकतात. या क्षेपणास्त्राचे नाव अबाबिल असल्याचे सांगण्यात आले. अहवालानुसार, या क्षेपणास्त्राच्या स्थितीबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
इस्लामाबादमध्ये विकसित केले जात आहेत आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपक
अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आणि त्यांचे मोबाईल लाँचर्स इस्लामाबादच्या पश्चिमेला काला चित्ता दाहर पर्वत रांगेत असलेल्या राष्ट्रीय संरक्षण संकुलात विकसित केले जात आहेत. या संकुलाचे दोन भाग उपग्रह प्रतिमांमध्ये दिसत आहेत. क्षेपणास्त्रे आणि रॉकेट इंजिने पश्चिम भागात विकसित, उत्पादित आणि चाचणी केली जातात.
पाकिस्तानच्या कहुता आणि गडवाल भागात अण्वस्त्रे बनवण्यासाठी आवश्यक साहित्य आणि युरेनियम प्लांट तयार करण्यासाठी सुविधा निर्माण करण्याचे काम पूर्णत्वास येत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. पाकिस्तान चार हेवी वॉटर प्लुटोनियम उत्पादन अणुभट्ट्या देखील बांधत आहे. यातील सर्वात नवीन प्लुटोनियम अणुभट्ट्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ३३ किलोमीटर अंतरावर आहेत.
मिराज-3, मिराज-5 अशी विमाने आहेत ज्यात पाकिस्तान अण्वस्त्रे बसवू शकतो. हे लढाऊ बॉम्बर्स दोन एअरबेसवर तैनात आहेत. त्यापैकी एक मसरूर एअरबेस आहे, तर दुसरा रफीकी एअरबेस आहे.
Despite being poor, Pakistan still has nuclear weapons; Increase in the number of nuclear bombs, 170 nuclear weapons are revealed in the US report
महत्वाच्या बातम्या
- अमृता देशमुख चा होणाऱ्या नवऱ्यासाठी खास उखाणा! समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल
- ”जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी आहे, ते कधीच…” अमित शाह यांचे विधान!
- बहुजनांनी तुम्हा उच्चवर्णीयांसाठी फक्त बलिदानच द्यायचे का??; सुजात आंबेडकरांनी रोहित पवारांना फटकारले
- लष्कराने घेतला हौतात्म्याचा बदला, बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; अनंतनागमध्येही कारवाई सुरूच