• Download App
    देशमुखांच्या घरी 7 वेळा छापे टाकले. मग पहिल्या 6 वेळी नक्की काय चुकलं? ; सुप्रिया सुळे|Deshmukh's house was raided 7 times. So what exactly went wrong the first 6 times? ; Supriya Sule

    देशमुखांच्या घरी 7 वेळा छापे टाकले. मग पहिल्या 6 वेळी नक्की काय चुकलं? ; सुप्रिया सुळे

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : मागील गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा सिलसिला चालू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षातील बऱ्याच नेत्यांनी केले होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी या मुद्द्यावर भाजपला बऱ्याच वेळा टार्गेट केले होते.Deshmukh’s house was raided 7 times. So what exactly went wrong the first 6 times? ; Supriya Sule

    ईडी, सीबीआयचे छापे टाकल्यानंतर हे राजकारण बरेच पेटले हाेते. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी लोकसभेत बोलताना भाजपवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार पुढील 25 वर्षे चालेल.



    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, अनिल देशमुख यांच्या घरावर एकूण 7 वेळा छापा टाकण्यात आला. आणि हा एक विक्रमच झाला आहे. तुम्ही कल्पना करा की, एकाच कुटुंबावर 7 वेळा छापा टाकला जातो, तर पहिल्या 6 वेळी नेमके काय चुकले होते? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला. तपास यंत्रणा आता संबंधित व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटूंबाला देखील टार्गेट करत आहेत, असे देखील त्या म्हणाल्या.

    त्याचप्रमाणे मागे हर्षवर्धन पाटील यांनी एक वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, आम्ही आता भाजपमध्ये आहोत. त्यामुळे आमच्याकडे ईडी आणि सीबीआय येऊ शकत नाहीत. या वक्तव्याचा आधार घेत सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, हर्षवर्धन पाटील यांनी केलेले विधान हे अतिशय धक्कादायक आहे. ईडी आणि सीबीआय फक्त अशा राज्यांच्या विरोधात का वापरल्या जातात? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे.

    Deshmukh’s house was raided 7 times. So what exactly went wrong the first 6 times? ; Supriya Sule

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- करूर चेंगराचेंगरीची निष्पक्ष चौकशी व्हावी; पर्यवेक्ष समितीत तामिळनाडूचा मूळ रहिवासी नसण्याचा पुन्हा आदेश

    Ashwini Vaishnaw : रेल्वेने या वर्षी 3.02 कोटी बनावट-IRCTC खाती बंद केली; अश्विनी वैष्णव म्हणाले- काळाबाजार रोखण्यासाठी OTP; यामुळे 65% प्रकरणांमध्ये सुधारणा

    Zubeen Garg : गायक जुबीन गर्ग प्रकरणात 3500 पानांचे आरोपपत्र दाखल; पुरावे चार ट्रंकमध्ये भरून न्यायालयात आणले