• Download App
    कुराणातील 26 वचने काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली ; वासीम रिझवी यांना 50 हजारांचा दंड ठोठावला | Demand for removal of 26 verses from Quran The petitioner was dismissed

    कुराणातील २६ वचने काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली ; वासीम रिझवी यांना ५० हजारांचा दंड ठोठावला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कुराणातील 26 जिहादी वचने काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली असून याचिकाकर्ते वासीम रिझवी यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. Demand for removal of 26 verses from Quran The petitioner was dismissed

    मोहम्मद पैगंबर साहेब यांनी कुराण लिहिले. परंतु, त्यानंतर आलेल्या खलिफानी आपल्या स्वार्थासाठी 26 वचने कुराणात घुसडली आहेत, असा आरोप उत्तरप्रदेशातील वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वासिम रिझवी यांनी केला होता. कुराण सुंदर वचनांनी युक्त आहे.



    पण, 26 वचने ही समाजविघातक आणि हिंसाचारला प्रोत्साहन देणारी आहेत. या वचनांचा आधार घेऊन दहशतवादी गैरमुस्लिमांचे जिहादच्या नावाखाली मुडदे पाडत आहेत. त्यामुळे ती कुराणातून काढून टाकण्याची मागणी रिझवी यांनी केली होती. तसेच या मुद्यावर सर्वोच्च न्यायालायात याचिका काही दिवसांपूर्वी दाखल केली होती.

    न्यायमूर्ती रोहिटंन नरिमन फली यांच्या नेतृत्वाखालील पीठाने रिझवी यांच्या याचिकेवर 12 एप्रिलला त्या याचिकेवर सुनावणी घेतली.
    एएनआयच्या म्हणण्यानुसार, रिझवी यांनी याचिकेत विविध मुद्दे मांडून 26 वचने कशी चुकीची आहेत, याचा तपशील दिला. पुढे त्यांनी म्हटले आहे की, जर कोर्टाला योग्य वाटत असेल तर भारत सरकारने या विषयावर आपले धोरण जाहीर करावे / श्वेतपत्रिका काढावी किंवा योग्य कायदा करावा.

    Demand for removal of 26 verses from Quran The petitioner was dismissed

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार