• Download App
    Delhi results काँग्रेसने 4000 मतांचा कोलदांडा घातला; नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवालांचा पराभव झाला!!

    Delhi results : काँग्रेसने 4000 मतांचा कोलदांडा घातला; नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवालांचा पराभव झाला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने घातला 4000 मतांचा कोलदांडा, नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवालांचा पराभव झाला. नवी दिल्ली मतदार संघातल्या आकडेवारीने हे चित्र समोर आणले.

    नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांच्यात लढत झाली. ही सगळ्यात हाय प्रोफाईल लढत ठरली. कारण प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव, तर संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव यांच्याशी अरविंद केजरीवाल या आम आदमी पार्टीच्या सर्वेसर्वांची लढत झाली.

    या लढतीत प्रवेश वर्मा यांना 28 हजार 448 मते मिळाली तर अरविंद केजरीवाल यांना 24 हजार 583 मते मिळाली. संदीप दीक्षित यांना 4254 मते मिळाली. केजरीवाल यांचा 3865 मतांनी पराभव झाला. अर्थातच काँग्रेसची संदीप दीक्षित यांची 4254 मते निर्णायक ठरली. केजरीवाल यांच्याविरुद्ध संदीप दीक्षित उभे राहिले नसते तर ती मते कदाचित केजरीवाल यांना मिळाली असती आणि त्यांचा निसटता का होईना, पण विजय झाला असता, पण काँग्रेसने तिरंगी लढत करून कोलदांडा घातला आणि केजरीवालांचा पराभव केला.

    Delhi results : Division of votes lead to arvind kejriwal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Khalistani : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी लिहिले खलिस्तानी नारे; दहशतवाद्याने ट्रेनमधील व्हिडिओ जारी केला; खालडांचा उल्लेख

    West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये बोट उलटली, 15 भारतीयांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी होते, यातील बहुतांश पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील होते