• Download App
    terror attack एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची "तहान"; दुसरीकडे भारतातच हल्ले करायचा ISI मॉड्यूलचा पर्दाफाश!!

    एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची “तहान”; दुसरीकडे भारतातच हल्ले करायचा ISI मॉड्यूलचा पर्दाफाश!!

    नाशिक : भारताने सिंधू जलकरार आवळून धरल्यामुळे एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चेची तहान; दुसरीकडे भारतातच हल्ले करायचा ISI मॉड्यूलचा पर्दाफाश!!, असला प्रकार समोर आलाय.

    – 111 बुद्धिमत्तांचे पत्र

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता चर्चा पुन्हा सुरू करावी, यासाठी भारत आणि पाकिस्तान मधल्या 111 बुद्धिमंतांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना पत्र लिहिले. या पत्रावर सही करणाऱ्यांमध्ये जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, रिसर्च अँड एनालिसिस विंगचे माजी प्रमुख अमरजित सिंग दुलत यांचा समावेश राहिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या जनतेमध्ये संवाद वाढावा, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याचा दावा करून दुलत यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेचे झेंगट संघाच्या गळ्यात घातले.

    – पाकिस्तानचा दुहेरी डाव उघड्यावर

    पण त्याचवेळी पाकिस्तानचा दुहेरी डाव उघड्यावर आला. पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयने भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये धार्मिक ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी काही दहशतवादी पाठविले. ते हल्ला करायच्या तयारीत असतानाच आज राजधानी नवी दिल्लीत पकडले गेले. त्यांनी दिलेल्या माहितीतून पाकिस्तानचा दुहेरी डाव उघड्यावर आला.

    – पाकिस्तानी हॅन्डलरशी संबंध

    पाकिस्तानस्थित आयएसआय (ISI) हँडलर शहजाद भट्टी याच्या सूचनेवरून राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पंजाब आणि दिल्लीतील चार जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे शुभदीप सिंग (२३), गुरजंत सिंग (२२), साजन सिंग (२८) आणि गगनप्रीत (२४) अशी आहेत. यापैकी तिघे पंजाबमधील आहेत, तर एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून परदेशी बनावटीचे दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त केले.

    – आरोपींची हल्ल्याची कबुली

    चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, पकडले जाणे टाळण्यासाठी ते परदेशी फोन नंबर्सचा वापर करून पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. त्यांना सीमापारवरून ड्रोनद्वारे शस्त्रे आणि अमली पदार्थ पुरवले जात होते. आरोपींपैकी गगनप्रीत याने दिल्लीतील पोलीस ठाणी आणि धार्मिक स्थळांची रेकी (पाहणी) केली होती आणि त्याच्यावर गोळीबाराची घटना घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याप्रकरणी ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) आणि ‘आर्म्स ॲक्ट’च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेटवर्कमधील इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी ‘स्पेशल सेल’कडून पुढील तपास सुरू आहे.

    याचाच अर्थ एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चेची तहान लागली होती, पण त्याचवेळी त्याची गुप्तहेर संस्था ISI भारतात हल्ले करायच्या बेतात होती. दहशतवाद्यांच्या अटकेमुळे पाकिस्तानचा दुहेरी डाव उघड्यावर आला.

    Delhi Police’s Special Cell has arrested four men from Punjab and Delhi for allegedly planning a terror attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ram Mandir : राममंदिर चोरी- आरोपी अविनाशच्या घरातून 20 लाख रुपये सापडले; 1000 डॉलर्सही जप्त करण्यात आले

    PM Modi : भारत-पाक मधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी-शाहबाजना पत्र; म्हटले- शत्रुत्व संपवा, संवाद आणि संबंध पुन्हा सुरू करा

    Proposed Law : 30 दिवस तुरुंगात राहिल्यास PM-CM ची खुर्ची जाईल; संसदीय समिती तरतूद हटवण्याच्या बाजूने नाही; पावसाळी अधिवेशनात विधेयक पुन्हा येऊ शकते