वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची कन्या आराध्या हिने काही यूट्यूब चॅनलविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या यूट्यूब चॅनेल्सनी काही दिवसांपूर्वी आराध्याच्या प्रकृतीबाबत फेक न्यूज दिल्या होत्या. आराध्याने आपल्या याचिकेत या चॅनल्सवर आणि त्यातील कंटेंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 20 एप्रिलला म्हणजेच आजच याप्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे.Delhi High Court to hear Aaradhya Bachchan’s plea today, seeking ban on YouTube channel giving fake news about health
आपण अल्पवयीन असल्याचा हवाला देत आराध्याने या यूट्यूब चॅनेलवरून तिच्यावर बनवलेले सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. याचिकेसाठी Google LLC आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पक्षकार बनवले आहे. या याचिकेबाबत बच्चन कुटुंबाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
16 नोव्हेंबरला 11 वर्षांची झाली आराध्या
आराध्याने 16 नोव्हेंबरला तिचा 11वा वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्त कुटुंबाने घरी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या भव्य पार्टीत बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व मित्र सहभागी झाले होते. रितेश देशमुख पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आणि मुलांसह पार्टीत पोहोचला होता. याशिवाय 90च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेही तेव्हा दिसली होती.
नीता अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी आराध्या आई ऐश्वर्यासोबत आली होती. एप्रिलच्या सुरुवातीला ऐश्वर्या राय बच्चन आराध्याला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनासाठी घेऊन आली होती. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि नात आराध्या दिग्गज अभिनेत्री रेखासोबत दिसत होत्या.
Delhi High Court to hear Aaradhya Bachchan’s plea today, seeking ban on YouTube channel giving fake news about health
महत्वाच्या बातम्या
- येमेनमध्ये चॅरिटी इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी, 85 ठार, हुथी सैन्याने गर्दीवर नियंत्रणासाठी केला गोळीबार
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!