• Download App
    महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओच्या लिंक्स हटवा, दिल्ली उच्च न्यायालयाचे गुगल आणि युट्यूबला आदेश|Delhi High Court orders Google and YouTube to delete links to offensive photos and videos of women

    महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओच्या लिंक्स हटवा, दिल्ली उच्च न्यायालयाचे गुगल आणि युट्यूबला आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महिलांच्या आक्षेपार्ह छायाचित्रप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने गुगल आणि यू ट्यूबला दणका दिला आहे. एका विवाहित महिलेची आक्षेपार्ह छायाचित्रे तसेच व्हिडिओ असणाऱ्या वेबसाईट्स आणि संबंधित लिंक्स हटविण्याबाबत ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुगल, युट्यूब आणि दिल्ली पोलिसांना दिले आहेत.Delhi High Court orders Google and YouTube to delete links to offensive photos and videos of women

    दिल्लीतील या महिलेने बनावट नावाखाली सुरू असलेल्या पॉर्नाेग्राफिक वेबसाईट्स ब्लॉक करण्याची याचिका दाखल केली होती. अशा साईट्सवरील याचिकाकर्ता महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्रे, व्हिडिओ ब्लॉक करण्याचे निर्देश गुगलला देण्यात यावे, अशी मागणीही त्यात केली होती.



    गुगलची बाजू मांडणाऱ्या अधिवक्ता ममता झा यांनी न्यायालयाला सांगितले, की युट्यूबवरील सर्व संबंधित लिंक हटविण्यात आल्या असून १० चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने गुगल, युट्यूब, केंद्र सरकार तसेच दिल्ली पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी १६ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे.

    Delhi High Court orders Google and YouTube to delete links to offensive photos and videos of women

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही