• Download App
    Delhi High Court: UCC Need, Personal Law Conflict POCSO दिल्ली हायकोर्टाचे मत- समान नागरी कायदा काळाची गरज

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाचे मत- समान नागरी कायदा काळाची गरज, पर्सनल लॉमध्ये बालविवाहाला परवानगी, परंतु POCSO अंतर्गत तो गुन्हा

    Delhi High Court

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Delhi High Court दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी देशात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याची बाजू मांडली. न्यायालयाने असे नमूद केले की पर्सनल लॉ बालविवाहाला परवानगी देतो, परंतु POCSO कायदा आणि BNS त्याला गुन्हेगार ठरवतात. या कायद्यांमधील वारंवार होणारे संघर्ष लक्षात घेता, स्पष्ट कायदेशीर व्याख्या आवश्यक आहे.Delhi High Court

    न्यायमूर्ती अरुण मोंगा यांनी विचारले की, बऱ्याचदा आपल्याला असा पेच पडतो की, दीर्घकाळापासून चालत आलेल्या पर्सनल लॉ चे पालन केल्याबद्दल समाजाला गुन्हेगार ठरवावे का?Delhi High Court

    न्यायमूर्ती मोंगा यांनी विचारले की, पर्सन लॉसारखे कायदे राष्ट्रीय कायद्यांना मागे टाकू नयेत म्हणून एक चौकट तयार करून, यूसीसीकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे का?Delhi High Court


     


    अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याचा आरोपी हामीद रझा याच्या जामीन अर्जाशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाची ही टिप्पणी आली.

    अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याबद्दल हमीदवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत आरोप आहे. मुलीच्या सावत्र वडिलांनी रझाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

    तथापि, न्यायालयाने असे नमूद केले की सध्याच्या प्रकरणात, अल्पवयीन मुलगी रझा अटक होण्यापूर्वी तिच्यासोबत राहत होती. तिच्या वडिलांनी स्वतःचा गुन्हा लपविण्यासाठी एफआयआर दाखल केला होता. हमीद रझाला जामीन मंजूर करण्यात आला.

    उत्तराखंड हे यूसीसी लागू करणारे देशातील पहिले राज्य

    उत्तराखंड हे समान नागरी संहिता (UCC) लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी २७ जानेवारी २०२५ रोजी याची घोषणा केली. UCC लागू झाल्यापासून, उत्तराखंडमध्ये हलाला, बहुपत्नीत्व आणि तिहेरी तलाक सारख्या प्रथांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

    गोव्यानंतर उत्तराखंड हे यूसीसी लागू करणारे पहिले राज्य आहे. गोव्यात आधीच यूसीसी असला तरी, ते पोर्तुगीज नागरी संहितेअंतर्गत लागू करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य बनले.

    Delhi High Court: UCC Need, Personal Law Conflict POCSO

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : दिल्ली-NCRमध्ये फटाके बनवण्यास परवानगी, पण विक्रीवर बंदी; सुप्रीम कोर्टाने म्हटले- फक्त ग्रीन फटाके तयार करता येतील

    दिल में काबा, नजर में मदिना; दुर्गा पूजेच्या मांडवात ममता बॅनर्जींची चाटूकारिता!!

    Bareilly : यूपीच्या बरेलीत शुक्रवारच्या नमाजानंतर गोंधळ; आंदोलनाची परवानगी रद्द; संतप्त जमावाची दगडफेक