Wednesday, 7 May 2025
  • Download App
    द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस, अनुराग ठाकूर यांच्यासह आप नेते आणि स्वरा भास्कर यांचाही समावेश|Delhi High Court issues notice to Sonia, Rahul and Priyanka Gandhi for making hate speech, including Anurag Thakur, AAP leader and Swara Bhaskar

    द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस, अनुराग ठाकूर यांच्यासह आप नेते आणि स्वरा भास्कर यांचाही समावेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वड्रा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकांमध्ये त्यांना प्रतिवादी केले आहे.Delhi High Court issues notice to Sonia, Rahul and Priyanka Gandhi for making hate speech, including Anurag Thakur, AAP leader and Swara Bhaskar

    वकील व्हॉईस ओर्स आणि शेख मुजतबा फारुक यांनी केलेल्या याचिकांमध्ये 24 लोकांना प्रतिवादी केले आहे. व्हॉईस ओर्स यांनी केलेल्या याचिकेत आप नेते मनीष सिसोदिया, अमानतुल्ला खान यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.



     

    एमआयएमआयचे अकबरुद्दीन ओवेसी, वारिश पठाण; वकील मेहमूद प्राचा; कार्यकर्ते हर्ष मंदर; मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी.जी कोळसे पाटील; विद्यार्थी कार्यकर्ते उमर खालिद; अभिनेत्री स्वरा भास्कर यांचाही त्यामध्ये समावेश आहे. फारुख यांनी आपल्या अर्जात अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा आणि अभय वर्मा यांच्यासह भाजप नेत्यांना दोषी ठरवण्याची मागणी केली आहे.

    न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदिरट्टा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी 22 मार्च रोजी ठेवताना प्रस्तावित प्रतिवादींना नोटीस बजावली. आम्ही कायद्यानुसार प्रस्तावित प्रतिवादींना प्रत्युत्तर देण्यासाठी नोटीस जारी करणे योग्य समजतो .

    Delhi High Court issues notice to Sonia, Rahul and Priyanka Gandhi for making hate speech, including Anurag Thakur, AAP leader and Swara Bhaskar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- भारतात आरक्षण रेल्वेच्या डब्यासारखे; आत असलेल्यांना वाटते इतरांनी आत येऊ नये

    PM Modi : पाकिस्तानवर एअर स्ट्राइकपूर्वी PM म्हणाले होते- भारताचे पाणी भारतासाठी वाहणार

    Air strike on Pakistan : पाकिस्तानवर हवाई हल्ला, आज 244 ठिकाणी मॉक ड्रिल; हल्ल्यापासून वाचण्याचे मार्ग शिकवले जातील