यापूर्वी २८ मार्च रोजी न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली होती Delhi Excise Policy Chief Minister Arvind Kejriwal in judicial custody till April 15
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयच्या (ED) टीमने आज म्हणजेच सोमवारी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले. यावेळी न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी २८ मार्च रोजी न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. अशाप्रकारे केजरीवाल यांची ईडी रिमांड आज संपत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल कोर्टात पोहोचल्या.
ED ने 21 मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क प्रकरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली होती. अबकारी प्रकरणात 10व्या समन्ससह ईडी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते, जिथे त्यांनी अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी केली. या काळात ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मोबाईल फोनसह काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले, तेथून त्यांना 6 दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवण्यात आले. ईडीची टीम केजरीवाल यांची सतत चौकशी करत आहे. 28 मार्च रोजी कोर्टात हजेरी सुरू असताना ईडीच्या वकिलाने सांगितले की केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत. ते वारंवार अरविंद केजरीवाल यांना मोबाईलचा पासवर्ड विचारत आहे, पण ते सांगायला तयार नाहीत.
Delhi Excise Policy Chief Minister Arvind Kejriwal in judicial custody till April 15
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकन ब्रिज अपघातावर अमेरिकी मासिकात भारतीयांचे वर्णद्वेषी व्यंगचित्र; जहाजाचे क्रू मेंबर्स लंगोट घातलेले दाखवले
- बारामतीत रंगणार पवार घराण्यातील संघर्ष, सुनेत्रा पवारांना महायुतीची उमेदवारी जाहीर, सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात
- बारामतीत नणंद भावजयीचा लढा, फक्त नव्हे काका – पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला; तर अख्ख्या पवार कुटुंबाच्या राजकारणाभोवती आवळलेला तिढा!!
- बायडेन म्हणाले- अरब देश इस्रायलला मान्यता देण्यास तयार; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी युद्धानंतर गाझाच्या स्थितीचा उल्लेख केला