विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काँग्रेसला झिडकारल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उत्तर प्रदेशात अवघ्या 17 जागा देऊन कुरवाळले. दिल्लीत आम आदमी पार्टीने काँग्रेसला धाकटा भाऊ केले. त्यामुळे उत्तरेत कसाबसा काँग्रेस प्रणित INDI आघाडीचा बोलबाला पुन्हा सुरू झाला होता, तोच डाव्या पक्षांनी केरळच्या वायनाड मध्ये राहुल गांधींच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांच्या महत्त्वाकांक्षेला खोडा घातला.Delhi | CPI announces candidates on Thiruvananthapuram, Wayanad, Thrissur, and Mavelikara Lok Sabha seats in Kerala.
राहुल गांधींच्या विरोधात उमेदवार उभा करताना तो दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय कम्युनिस्ट पार्टीने पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांची पत्नी ॲनी राजा यांनाच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे आता वायनाड मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार ॲनी राजा यांची लढत होणार आहे.
काँग्रेस प्रणितINDI आघाडीची गाडी हळूहळू रुळावर येत चालली होती कारण अखिलेश यादव यांच्यासारखा उत्तरेतला बडा नेता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाला होता. पण काँग्रेससाठी ही सुखद बातमी येऊन एक दिवस झाला आणि तो उलटून जाताच केरळमध्ये काँग्रेसला किंबहुना राहुल गांधींनाच भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धक्का दिला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केरळमध्ये 4 उमेदवार जाहीर केले. यामध्ये त्यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार शशी थरूर यांच्या विरोधात देखील उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे आता केरळमध्ये पारंपारिक दृष्ट्या जी लढत होत आली आहे, ती डावी आघाडी विरुद्ध काँग्रेस आघाडी जशीच्या तशी कायम राहणार आहे. त्यामध्ये INDI आघाडीचा काहीही संबंध राहिलेला नाही.
Delhi | CPI announces candidates on Thiruvananthapuram, Wayanad, Thrissur, and Mavelikara Lok Sabha seats in Kerala.
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचे जनतेला खुले पत्र, भाजपसोबत जाण्याविषयी स्पष्ट केली भूमिका; मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास
- जरांगेंनी फडणवीसांची माफी मागावी, अन्यथा ओबीसी मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा!!
- जरांगेंची भाषा “राजकीय”, ठाकरे – पवारांच्या स्क्रिप्टनुसारच जरांगे बोलतात!!; शिंदे – फडणवीसांचे संयमी, पण ठाम प्रत्युत्तर!!
- जोशी – महाजनांवरचा “पवार प्रयोग” फसला; फडणवीसांवरचा “जरांगे प्रयोग” यशस्वी होईल का??