• Download App
    केजरीवाल आलेत फक्त 21 दिवसांसाठी "बाहेर"; त्यांनी दम दिला ममता + उद्धव + स्टालिन जातील "आत"; पण राहुल + पवार राहतील ना "बाहेर"!! Delhi CM Arvind Kejriwal says bjp will send opposition leaders to jail

    केजरीवाल आलेत फक्त 21 दिवसांसाठी “बाहेर”; त्यांनी दम दिला ममता + उद्धव + स्टालिन जातील “आत”; पण राहुल + पवार राहतील ना “बाहेर”!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अडकलेले मुख्य आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल फक्त 21 दिवसांसाठी अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत, ते देखील सुप्रीम कोर्टाने तो जामीन मंजूर केल्यामुळे हे घडले आहे!!, पण त्याच वेळी त्यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयात न जाण्याची आणि कुठल्याही सरकारी कागदावर स्वाक्षरी न करण्याची अट लागू आहे. Delhi CM Arvind Kejriwal says bjp will send opposition leaders to jail

    पण एवढ्या सगळ्या बंधनांमधूनही केजरीवाल यांनी संपूर्ण देशात हुकूमशहाच्या राजवटीत पुढे काय होणार याचे दिल्ली “भेंडवळी भाकीत” वर्तवले आहे.

    देशात हुकूमशाह सत्तेवर आला, तर तो अमित शहांना पंतप्रधान बनवेल. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदापासून दूर हटवेल. त्यांचे राजकारण संपवेल, असे भाकीत तर केजरीवालांनी केलेच आहे, पण त्या पलीकडे जाऊन आत्तापर्यंतच्या तुरुंगात गेलेल्या नेत्यांची नावे वाचून दाखवत यापुढे नेमके कोण तुरुंगात जाणार??, याची यादी ही लोकांसमोर सादर केली आहे.

    देशाच्या हुकूमशाहाने मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांचे मंत्री यांना तुरुंगात घातलेच, पण हा हुकूमशाह जर पुन्हा निवडून आला तर तो ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, पिनाराई विजयन अशा विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही तुरुंगात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. पण या इशाऱ्यातून केजरीवालांनी राहुल गांधी आणि शरद पवारांची नावे वगळली.

    त्या पलीकडे जाऊन देशातल्या हुकूमशाहाने कोणाकोणाचे राजकारण संपवले??, याची भली मोठी यादीच वाचून दाखवली. या हुकूमशाहाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, रमण सिंह यांचे राजकारण संपवले आणि पुढचा नंबर आता हा हुकूमशहा योगी आदित्यनाथांचा लावेल. हा हुकूमशाह पुन्हा निवडून आला, तर दोन महिन्यात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करेल, असा “जावईशोध” केजरीवालांनी लावला.

    आपल्या पाठोपाठ बाकीच्या नेत्यांनी तुरुंगाची वारी करावी लागेल असा इशारा देताना केजरीवालांनी बाकी सगळ्यांच्या खुर्ची खाली एक राजकीय बॉम्ब लावून ठेवला. त्याचबरोबर कोणाचे राजकारण संपवले आणि कोणाचे राजकारण संपवणार, याची यादी वाचताना केजरीवालांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांचे नाव मात्र वगळले. त्यामुळे केजरीवाल यांना “बाहेर” येऊन नेमके काय साध्य करायचे आहे??, असा सवाल तयार झाला आहे.

    Delhi CM Arvind Kejriwal says bjp will send opposition leaders to jail

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही