विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यातले मुख्य आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावरील सुटकेनंतर त्यांचे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले, पण हे स्वागत करताना ते केवळ फटाके फोडून थांबले नाहीत, तर दारू घोटाळ्यातल्या मुख्य आरोपीच्या स्टेजवर आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी प्रख्यात क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांनी लिहिलेले आणि भगतसिंग यांनी गायलेले “मेरा रंग दे बसंती चोला” हे गाणे वाजवून त्या स्फूर्तीदायक गीताची बदनामी केली. Delhi CM Arvind Kejriwal blows a flying kiss to his supporters and party workers as he arrives at a party event in Delhi.
अरविंद केजरीवाल्यांची अंतरिम जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही किंवा कुठल्याही सरकारी कागदपत्रावर स्वाक्षरी करता येणार नाही, तरी देखील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अंतरिम जामीनावर कुठलातरी मोठा क्रांतिकारक सुटलाय!! असा आव आणत त्यांचे जोरदार स्वागत केले. केजरीवालांनी देखील ते स्वागत मोठ्या क्रांतिकारकाच्या थाटात स्वीकारले.
दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस मधल्या हनुमान मंदिराला भेट दिल्यानंतर केजरीवाल आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात पोहोचले. तिथे स्टेजवर त्यांच्या समवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे अनेक मंत्री हजर होते. केजरीवाल स्टेजवर पोहोचतात तिथे “मेरा रंग दे बसंती चोला” हे गीत वाजायला लागले.
वास्तविक हे गीत भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेले प्रख्यात क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांनी लखनऊ जेलमध्ये लिहिले होते. इंग्रजांना डिवचण्यासाठी आपण भारतीय सण साजरी करायचे आणि ते जल्लोषात साजरे करायचे यासाठी रामप्रसाद बिस्मिल यांनी महाराणा प्रताप आणि बाकीच्या भारतीयांना वीरांना समर्पित असे “मेरा रंग दे बसंती चोला” हे गीत लिहिले. ते काकोरी कटाच्या सगळ्या क्रांतिकारकांनी भर कोर्टात गायले होते.
त्यानंतर भगतसिंग यांनी लाहोर जेलमध्ये ही आज गीतामध्ये आणखी काही भर घालून त्याचे गायन केले होते. उत्तर भारतातल्या आणि दक्षिण भारतातल्या सगळ्या क्रांतिकारकांमध्ये “मेरा रंग दे बसंती चोला” हे गीत प्रचंड लोकप्रिय होते. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते भारताच्या रस्त्या-रस्त्यांवर गायले गेले.
मात्र आज तेच गीत दिल्ली दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अडकलेल्या मुख्य आरोपीच्या म्हणजे अरविंद केजरीवालांच्या सुटकेनंतर त्यांच्या स्टेजवर वाजवले गेले. अरविंद केजरीवाल हे स्वतःला भगतसिंगांचे पुजारी मानतात. ते सरकारी कार्यालयांमध्ये आणि आम आदमी पार्टीच्या कार्यालयांमध्ये फक्त भगतसिंग आणि डॉ. आंबेडकरांचे फोटो लावतात. यातून त्यांचा आपण भगतसिंगांचे राजकीय वारस असल्याचा आव असतो. म्हणूनच त्यांच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांची फक्त अंतरिम जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या स्टेजवर “मेरा रंग दे बसंती चोला” हे गीत वाजविले.
– रामप्रसाद बिस्मिल्लांची मूळ कविता
मेरा रंग दे बसन्ती चोला….
हो मेरा रंग दे बसन्ती चोला….
इसी रंग में रंग के शिवा ने मां का बन्धन खोला,
यही रंग हल्दीघाटी में था प्रताप ने घोला;
नव बसन्त में भारत के हित वीरों का यह टोला,
किस मस्ती से पहन के निकला यह बासन्ती चोला।
मेरा रंग दे बसन्ती चोला….
हो मेरा रंग दे बसन्ती चोला….
ही कविता नंतर भगतसिंगांच्या ऐकण्यात आली आणि त्यांना ती फार आवडली भगतसिंग यांनी त्यामध्ये आणखी काही पंक्ती जोडल्या.
त्या अशा :
इसी रंग में बिस्मिल जी ने ‘वन्दे-मातरम्’ बोला,
यही रंग अशफाक को भाया उनका दिल भी डोला
इसी रंग को हम मस्तों ने, हम मस्तों ने
दूर फिरंगी को करने को,
लहू में अपने घोला।
मेरा रंग दे बसन्ती चोला
हो मेरा रंग दे बसन्ती चोला
माय! रंग दे बसन्ती चोला
हो माय! रंग दे बसन्ती चोला
मेरा रंग दे बसन्ती चोला!!
Delhi CM Arvind Kejriwal blows a flying kiss to his supporters and party workers as he arrives at a party event in Delhi.
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी बृजभूषण यांच्यावर आरोप निश्चित; दिल्ली न्यायालयात सुनावणी
- पाकिस्तानने PoKमध्ये लावला कर्फ्यू; वाढती महागाई आणि वीज कपातीच्या विरोधात लोकांची निदर्शने
- ठाकरे + पवार + काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मशिदींमधून फतवे; राज ठाकरेंचा गंभीर इशारा!!
- निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गेंना फटकारलं!