• Download App
    दारू घोटाळ्यात अंतरिम जामीनावर सुटलेल्या अरविंद केजरीवालांचे "आप"कडून "हिरो" सारखे स्वागत!! Delhi CM Arvind Kejriwal addresses party workers after being released from Tihar jail

    दारू घोटाळ्यात अंतरिम जामीनावर सुटलेल्या अरविंद केजरीवालांचे “आप”कडून “हिरो” सारखे स्वागत!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अडकलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची आज सायंकाळी अंतरिम जामीनावर सुटका झाली. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दिल्लीच्या रस्त्यावर एखाद्या “हिरो” सारखेच स्वागत केले.

    दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवालांना ईडीने 23 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर कायद्याच्या कचाट्यात अडकून ते 1 एप्रिल रोजी तिहार तुरुंगात गेले. तेव्हापासून ते तिहार तुरुंगातच होते. तुरुंगात राहू नाही ते दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटूनच राहिले त्यांनी राजीनामा दिला नाही पण ते आपली पत्नी सुनीता हिला देखील मुख्यमंत्रीपदावर बसवू शकले नाहीत.

    दिल्ली हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांच्या खुर्चीला चिपकून राहण्याच्या प्रवृत्तीवर सडकून ताशेरे ओढले. परंतु केवळ कायद्याचा सन्मान राखत सुप्रीम कोर्टाने आज त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. तो जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने त्यांना 2 जून रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करण्याची अट घातली. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यास तसेच दिल्लीच्या सचिवालयात जाण्यास प्रतिबंध केला. केजरीवाल यांना फक्त लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारात भाग घेणे पत्रकार परिषदा घेणे एवढीच परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली. दिल्लीचा कारभार नायब राज्यपालांच्या हातातच राहणार आहे केजरीवाल्यांना सही करण्याचा कुठलाही अधिकार नाही असे सुप्रीम कोर्टाने ठामपणे स्पष्ट केले.

    इतक्या सगळ्या अटी शर्तींवर बाहेर आलेल्या केजरीवालांचे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर फटाके वाजवून स्वागत केले. केजरीवाल सुद्धा एखाद्या मोठ्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन यशस्वी होऊन बाहेर आल्याचा आव आणत व्हिक्टरी साईन करत बाहेर आले.

    Delhi CM Arvind Kejriwal addresses party workers after being released from Tihar jail

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे