• Download App
    दीनदयाळ, अटलजींच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे काँग्रेस सरकार आल्यावर बदलायची का?; सिद्धरामय्या यांचा मोदी सरकारला खोचक सवाल|Deendayal, should the names of government schemes named after Atalji be changed when the Congress government comes ?; Siddaramaiah's sharp question to Modi government

    दीनदयाळ, अटलजींच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे काँग्रेस सरकार आल्यावर बदलायची का?; सिद्धरामय्या यांचा मोदी सरकारला खोचक सवाल

    वृत्तसंस्था

    बेंगळुरू : दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आदींच्या नावाने सरकारी योजना आहेत. त्या योजनांची नावे बदलण्याची मागणी आम्ही करायची काय?, असा सवाल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी केला आहे.Deendayal, should the names of government schemes named after Atalji be changed when the Congress government comes ?; Siddaramaiah’s sharp question to Modi government

    राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. जनसंघ नेते दीनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे काँग्रेसने आपले सरकार आल्यावर बदलायची काय? एवढेच नाही तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने स्टेडियम आहे त्या स्टेडियमचे नाव देखील नंतर बदलायचे काय?, असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.



    राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. परंतु सिद्धरामय्या यांनी भाजप आणि जनसंघाच्या जुन्या नेत्यांची नावे घेऊन त्यांच्या नावाच्या सरकारी योजनांचा उल्लेख केला आहे.

    त्याच बरोबर काँग्रेसची सत्ता आली तर त्यांच्या नावांच्या योजनांची ना नावे बदलण्याचे ही सूतोवाच केले आहे.बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीका करताना जनसंघ आणि भाजपच्या नेत्यांची नावे घेऊन त्यांच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे बदलण्याचे सूतोवाच केलेले नाही.

    Deendayal, should the names of government schemes named after Atalji be changed when the Congress government comes ?; Siddaramaiah’s sharp question to Modi government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य