• Download App
    Pahalgam attack पाकिस्तानचा खरा सूड उगवणारे निर्णयकर्ते कामात मग्न; पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!

    Pahalgam attack : पाकिस्तानचा खरा सूड उगवणारे निर्णयकर्ते कामात मग्न; पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!

    नाशिक : पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानचा सूड उगवण्यासाठी निर्णय घेणारे महत्त्वाचे लोक शांतपणे कामात मग्न, पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!, अशी सगळ्या देशात लिबरल अवस्था आली आहे. Pahalgam attack

    पहलगाम हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त दोन वेळा त्या हल्ल्याचा उल्लेख करून पाकिस्तानला यापूर्वी शिकवला नसलेला आणि त्यांच्या कल्पनेच्या पलीकडेचा धडा शिकवू, असा इशारा दिला, पण त्या पलीकडे ते काहीही बोलले नाहीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील एक एकच वक्तव्य केले. भारतीय सैन्य दलाच्या चारही प्रमुखांनी तर एकही वक्तव्य केले नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल कधीही जाहीरपणे बोलतच नाहीत. त्यामुळे त्यांनी काही वक्तव्य करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, कारण हे सगळे त्यांच्या मुख्य कामात मग्न राहिले. कॅबिनेट कमिटी ऑन स्टेटस सारख्या महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये स्ट्रॅटेजी ठरवत राहिले. पण त्यातली कुठलीही माहिती कुठेही, कुणीही “लीक” करू शकले नाही. नेमकी काय स्ट्रॅटेजी ठरली, हे इतर कुणालाही कळले नाही.

    पण याच दरम्यान प्रसार माध्यमांमधले “तज्ज्ञ” आणि सोशल मीडियातले “अति तज्ज्ञ” यांनी मात्र “एक्सपर्ट कमेंट्स” भडीमार चालविला. जगातले सगळे युद्धशास्त्र जणू काही आपणच कोळून प्यायलोय, अशा थाटात या सगळ्यांनी सरकारने आणि भारतीय सैन्य दलाने “असे” करावे, “तसे” करावे, पाकिस्तान वर “इकडून” हल्ला करावा, “तिकडून” हल्ला करावा, असे सल्ले दिले. सर्जिकल स्ट्राईक करून झाला. एअर स्ट्राईकही करून झाला. आता पाण्यातून स्ट्राईक करावा, असा “अतिअभ्यासपूर्ण” सल्ला अनेक “अति तज्ज्ञांनी” दिला.

    सरकारच्या समर्थकांनी मोदी सरकार आता “असा” प्रहार करेल, “तसा” प्रहार करेल, अशा भविष्यवाणीच्या कुंडल्या मांडल्या, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सारख्या लिबरल नेत्यांनी पाकिस्तानची कड घेऊन त्या देशाबरोबरचे युद्ध धोकादायक असल्याचा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अध्यक्ष शरद पवारांनी सध्याच्या गंभीर परिस्थितीत कुठलाही धर्माचा विषय नको, अशा फाका मारल्या. पण त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारच्या उणीवा काढल्या. त्यांच्याच पक्षाच्या जयंत पाटलांनी तर गंभीर परिस्थितीत औचित्यभंग करून मोदी सरकारलाच पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार धरले. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले नसल्याचा अनाठायी मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांनी उगाळला. पण यापैकी कुणालाही सरकारची आणि भारतीय सैन्य दलाची खरी स्ट्रॅटेजी काय याची साधी भनकही लागली नाही.

    याच दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लष्करी कारवाईचे लाईव्ह रिपोर्टिंग करू नये, अशी तंबी अतिउत्साही प्रसार माध्यमांना आणि सोशल मीडिया चालकांना दिली. तरी देखील सोशल मीडियातल्या स्वयंघोषित तज्ज्ञांनी मोदी सरकार पाकिस्तानवर कोणत्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक करणार किंवा एअर स्ट्राईक करणार याच्या तारखा परस्पर जाहीर करून टाकल्या.

    – भारत आणि पाकिस्तान यांच्यातला फरक

    या सगळ्या माध्यमांच्या आणि सोशल मीडियाच्या गदारोळात सुरक्षा विषयातले खरे तज्ज्ञ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य तिलक देवाशेर यांनी मात्र भारतीय आणि पाकिस्तानी “थॉट आणि ॲक्शन प्रोसेस” मधला फरक नेमक्या शब्दांमध्ये समजावून सांगितला. पाकिस्तानी फक्त “टॅक्टिकली” विचार करतात, पण भारत, चीन, रशिया आणि अमेरिका यांच्यासारखे मोठे देश “स्ट्रॅटेजिकली” विचार करतात. त्यामुळे पाकिस्तानला कुठल्याही कारवाया करताना फारसा वेळ लागत नाही. हिट अँड रन केस सारख्या अनेक कारवाया करून पळ काढतात. जातात. पण भारतासारखा मोठा देश असा वरचा “टॅक्टिकल” विचार करून कुठलीही कार्यवाही करत नाही. त्यामुळे भारताला खऱ्या अर्थाने पाकिस्तानला जर धडा शिकवायचा असेल, पाकिस्तानची खरी दुखती रग म्हणजे पाकिस्तानी लष्कर कायमचे दाबून टाकले पाहिजे आणि त्यासाठी जो विशिष्ट वेळ लागेल, तो वापरला पाहिजे, असे ते म्हणाले. भारताने स्ट्रॅटेजी ठरवताना कुठल्याही वरवरच्या उथळ कमेंट्स कडे किंवा सल्ल्यांकडे लक्ष द्यायची गरज नाही. सुदैवाने भारतात मोदी पंतप्रधान असल्याने भारतीय सैन्य दलाला ते कारवाई करण्याची मोकळीक देतील त्याचवेळी राजनैतिक पातळीवर ते तेवढीच आक्रमक भूमिका ठेवतील, अशी खात्री असल्याने भारत स्वतः वेळ निवडून पाकिस्तानला धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    तिलक देवाशेर यांच्यासारख्या मुरलेल्या मुत्सद्द्याने नेमक्या शब्दांमध्ये भारताच्या पुढच्या धोरणाचे सूतोवाच केल्याने भारताच्या बदललेल्या आक्रमक स्ट्रॅटेजीचे मर्म लक्षात आले.

    Decision makers Cooley strategizing attack on Pakistan but others are bluburring

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हिंसाचाराच्या समर्थनार्थ व्हाट्सअॅप स्टेटस पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

    ED office : मुंबईतील ED कार्यालयास भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

    Pahalgam attack : माध्यमांनी सुरक्षा दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नये; पहलगाम हल्ल्यानंतर सरकारची सूचना