• Download App
    लुधियानाचा मृत्यूदर देशात सर्वाधिक, कोरोनाच्या विळख्याने अनेक राज्ये बेजार|Death rate in Ludhiana highest in country

    लुधियानाचा मृत्यूदर देशात सर्वाधिक, कोरोनाच्या विळख्याने अनेक राज्ये बेजार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लुधियानातील मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. लुधियानातील मृत्यूदर हा सुमारे अडीच टक्के आहे.Death rate in Ludhiana highest in country

    लुधियानात आतापर्यंत ५१ हजार ४९२ जणांना बाधा झाली असून १३०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रकरणात लुधियानाची स्थिती अतिशय शोचनीय बनली आहे. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर हा अडीच टक्के आहे.



    पंजाब, गुजरात, पश्चिेम बंगाल राज्यातील प्रमुख शहरात प्रत्येक शंभर बाधित रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू होत आहे. तर दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या प्रदेशात एक टक्क्यापेक्षा मृत्यूदर अधिक आहे.

    गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे अडीच हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून तेथे मृत्यूदर २.४ टक्क्यांवर पोचला आहे. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदौर, उज्जैन, जबलपूर, सागर आणि बऱ्हाणपूर येथे मृत्यूदर १ टक्का आहे.

    आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू इंदौर येथे झाले आहेत. भोपाळमध्ये आतापर्यंत ८४ हजार ३९६ जण बाधित झाले तर ७२४ जणांचा मृत्यू झाला.

    Death rate in Ludhiana highest in country

     

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज