• Download App
    कोरोना झालेल्या युवकांना फेरसंसर्गाचा धोका असल्याचे नव्या संशोधनात स्पष्ट, लसीकरण आवश्यकच Corona can be repeted if ignored young must vaccination

    कोरोना झालेल्या युवकांना फेरसंसर्गाचा धोका असल्याचे नव्या संशोधनात स्पष्ट, लसीकरण आवश्यकच

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – एकदा कोरोना झालेल्या युवकांना या विषाणुच्या संसर्गापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नाही. त्यांना कोरोनाची लागण पुन्हा होऊ शकते. त्यामुळे, त्यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. Corona can be repeted if ignored young must vaccination

    ‘द लॅन्सेट रेसपिरेटरी मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. यापूर्वी कोरोनाचा संसर्ग होऊन गेला असला आणि प्रतिपिंडे अस्तित्वात असली तरी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यकच आहे. तरुणांना कोरोनाचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो. शिवाय, पूर्वीप्रमाणे त्यांच्याकडून इतरांमध्येही तो पसरू शकतो.



    संशोधकांनी मागील वर्षी मे ते नोव्हेंबरदरम्यान कोरोना होऊन गेलेल्या युवकांवर संशोधन केले. यावेळी १८९ जणांपैकी (सिरोपॉझिटिव्ह) दहा टक्के म्हणजे १९ जणांना कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यांची इतर २,३४६ जणांपैकी पूर्वी संसर्ग न झालेल्या १,०७९ जणांशी तुलना केली.

    कोरोनावरील लशी उपलब्ध होत असतानाच पूर्वी कोरोना होऊन गेला असला तरीही युवकांना तो पुन्हा होऊ शकतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्तीची हमी मिळत नाही. त्यामुळेच अतिरिक्त संरक्षणासाठी लसीकरणाला पर्याय नाही.

    Corona can be repeted if ignored young must vaccination

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    CJP च्या आंदोलनात घुसले 400 पाकिस्तानी सोशल मीडिया हॅण्डलर्स आणि 2000 समाजकंटक; दिल्ली पोलिसांनी जाहीर केली धक्कादायक आकडेवारी!!

    रवनीत बिट्टू यांचा मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा; राष्ट्रपतींनी मंजूर केला; भाजपने राज्यसभेचे तिकीट दिले नव्हते, पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार

    स्वाक्षरी होताच अमेरिका-सौदीचा अणुकरार अडकला; ट्रम्प यांनी 24 तासांत नवीन अट जोडली, म्हणाले- सौदीने इस्रायलशी संबंध सामान्य करावेत