• Download App
    आंध्र प्रदेशच्या खासदाराच्या मुलीच्या गाडीने चिरडल्याने मद्यपीचा मृत्यू|Death of a drunkard who was riding the car of the MP of Andhra Pradesh

    आंध्र प्रदेशच्या खासदाराच्या मुलीच्या गाडीने चिरडल्याने मद्यपीचा मृत्यू

    घटनेनंतर फरार, अटकेनंतर लगेचच जामीन


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदाराच्या मुलीच्या कारने चिरडल्याने एका मद्यपीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खासदाराची मुलगी घटनास्थळावरून पळून गेली होती, तिला पोलिसांनी शोधून अटक केली गेली. मात्र, काही वेळातच तिला पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळाला.Death of a drunkard who was riding the car of the MP of Andhra Pradesh

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वायएसआर काँग्रेस खासदार बिदा मस्तान राव यांची मुलगी माधुरी आहे. माधुरीच्या कारने बेसंत नगर भागात रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका मद्यधुंद व्यक्तीला चिरडले, परिणामी त्याचा मृत्यू झाला.



    या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव सूर्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी सूर्या मद्यधुंद अवस्थेत चेन्नईच्या बेसंत नगर भागात फूटपाथजवळ रस्त्याच्या कडेला पडून होता. अचानक एक कार आली ज्यामध्ये माधुरी आणि तिची मैत्रीण प्रवास करत होत्या. टायगर वरदचारी फर्स्ट क्रॉस स्ट्रीटकडे वळल्यानंतर सूर्या रस्त्यावर पडलेला त्यांना दिसला नाही आणि कार त्याच्या अंगावर गेली, असा आरोपींचा दावा आहे.

    चेन्नई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी खासदाराची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा ज्या क्रमांकावरून रुग्णवाहिका मागवली होती त्याचा माग काढला. कारची नोंदणी पुद्दुचेरीमध्ये झाल्याचेही समोर आले आहे. मृत सूर्याची पत्नी विनीता हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    Death of a drunkard who was riding the car of the MP of Andhra Pradesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी