• Download App
    दाऊद वरच्या विष प्रयोगामुळे पाकिस्तानची पुरती गोची; उज्ज्वल निकमांचा टोला!!|Dawood's poison experiment has left Pakistan reeling; A bunch of brilliant nikams!!

    दाऊद वरच्या विष प्रयोगामुळे पाकिस्तानची पुरती गोची; उज्ज्वल निकमांचा टोला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट खटलातला प्रमुख आरोपी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम वर कराची मध्ये अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केल्याची बातमी आली तो मेल्याची “कन्फर्म” बातमी माध्यमांमध्ये पोहोचली. पण पाकिस्तान मात्र इंटरनेट बंद करून या बातमीवर अळीमिळी गुपचिळी करून बसला आहे. याबाबत मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला लढवणारे प्रख्यात वकील उज्वल निकम यांनी पाकिस्तानची गोची विशद केली आहे.Dawood’s poison experiment has left Pakistan reeling; A bunch of brilliant nikams!!

    दाऊद वर विष प्रयोग झाला. त्याच्यावर कराचीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि तो मेला. ही बातमी पाकिस्तान “कन्फर्म” करूच शकत नाही. कारण दाऊद पाकिस्तानात असल्याचे “सत्य” त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी कायमच नाकारले. आता जर पाकिस्तानने भारतीयांनी पाकिस्तानात येऊन दाऊद वर विष प्रयोग केल्याचे आरोप केले, तर पाकिस्तानचे राज्यकर्तेच सगळ्या जगासमोर उघडे पडतील, असा टोला उज्ज्वल निकम यांनी लगावला.



    काय घडतंय पाकिस्तानात?

    भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर असणारा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे अनेक पुरावे भारत सरकारने पाकिस्तान सरकारला दिले आहेत. मात्र, तरीदेखील दाऊद पाकिस्तानात नसल्याचाच जप पाकिस्तानमधील सरकार, लष्कर करत राहिले. त्यामुळेच आता पाकिस्तानची सगळ्या जगात गोची होत आहे, या नेमक्या मुद्द्यावर
    उज्ज्वल निकम यांनी बोट ठेवले.

    काय म्हणाले उज्ज्वल निकम?

    उज्ज्वल निकम म्हणाले, फक्त सोशल मीडिया नाही, तर पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनीही दाऊद वरच्या विष प्रयोगाची ही बातमी चालवली आहे. त्याला आधार म्हणजे पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. साधारणपणे पाकिस्तानात अंतर्गत यादवी सुरू असेल किंवा पाकिस्तानला जगापासून काही गोष्ट लपवायची असेल, तेव्हा पाकिस्तान संपूर्ण देशातली इंटरनेट सेवा बंद करते. भारतात असे कधी घडत नाही. पाकिस्तानमध्ये सध्या कोणतेही यादवी युद्ध चालू नाही. अमेरिकेनेही त्यासंदर्भात असा कोणताही खुलासा केला नाही.

    पाकिस्तानची पंचाईत!

    दाऊदवरील विष प्रयोगामुळे पाकिस्तानचीच पंचाईत झाली आहे. कारण आतापर्यंत पाकिस्तानकडून परवेज मुशर्रफ यांच्यासह सगळ्यांनीच मोठा दावा केला होता, की दाऊद इब्राहिम आमच्याकडे राहात नाही. दाऊद मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटात वाँटेड गुन्हेगार आहे. मी हा खटला चालवला, तेव्हा दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने कसा कट रचला, याचा पुरावा आम्ही न्यायालयात आरोपींची साक्ष घेऊन सादर केला. त्यामुळे आपले पितळ उघडे पडू नये म्हणून दाऊदला लपवण्यासाठी पाकिस्तान हे प्रयत्न करत आहे.

    पाकिस्तानची खरी गोची इथेच झाली आहे. पाकिस्तान दाऊदवर भारताने विष प्रयोग केला असा आता आरोप करूच शकत नाही. कारण दाऊद पाकिस्तानच्या भूमीत नाही, ही अधिकृत भूमिका पाकिस्तानने घेतली होती!!

    Dawood’s poison experiment has left Pakistan reeling; A bunch of brilliant nikams!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार