जाणून घ्या, आता नोट बदलण्याची अंतिम तारीख काय असणार?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने यावर्षी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. यासाठी सरकारने 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची तारीख निश्चित केली होती. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शेवटच्या दिवशी म्हणजेच आज (शनिवार) मोठा दिलासा दिला आहे. RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची तारीख वाढवली आहे. Date of exchange of Rs 2000 notes extended RBI issues new circular
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे. आरबीआयने सांगितले की, दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची तारीख आता 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
महिला आरक्षण विधेयक मंजूर होताच विरोधकांचा महिलांमध्ये जातीवादी फूट पाडण्याचा डाव; मोदींचा घणाघात
आता लोक 7 ऑक्टोबरपर्यंत बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलू शकतात. 7 ऑक्टोबरनंतर या नोटा फक्त RBI च्या 19 शाखांमध्ये जमा केल्या जातील, त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या जवळील २ हजार रुपयांच्या नोटा नियोजित तारखेपूर्वी बँकांमध्ये जमा कराव्यात.
यापूर्वी बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची तारीख आज म्हणजेच शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. त्याच वेळी, एटीएममध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची वेळ आज मध्यरात्री 12 पर्यंत आहे. आता आरबीआयने नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्याची मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. आरबीआयने म्हटले आहे की 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील. आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत.
Date of exchange of Rs 2000 notes extended RBI issues new circular
महत्वाच्या बातम्या
- महिला आरक्षण विधेयकाचा झाला कायदा, राष्ट्रपतींची स्वाक्षरी; राजपत्रित अधिसूचनाही जारी
- केजरीवाल म्हणाले- आप इंडियासाठी कटिबद्ध, आम्ही वेगळे होणार नाही, पंजाबमधील काँग्रेस आमदाराची अटक ही कायदेशीर बाब!
- इस्कॉनची मनेका गांधींना 100 कोटींची मानहानीची नोटीस; म्हटले- इस्कॉनचे भक्त आणि हितचिंतक आरोपांमुळे अतिशय दु:खी झाले
- “ना मी बॅनर लावणार, ना चहा देणार…” लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचं विधान