- या पोटनिवडणुकीत ७५.९१ टक्के मतदान पार पडलंय. ३३३ मतदान केंद्रांवर मतदान झालं. Dadra Nagar Haveli Election Result: Kalaben Delkar’s strong batting, leading with 19,882 votes
विशेष प्रतिनिधी
सिल्वासा : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली आहे. दरम्यान या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना संधी देऊन महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली.
या पोटनिवडणुकीत ७५.९१ टक्के मतदान पार पडलंय. ३३३ मतदान केंद्रांवर मतदान झालं. तसेच शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली.
दरम्यान या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी सहभाग घेतला.
Dadra Nagar Haveli Election Result: Kalaben Delkar’s strong batting, leading with 19,882 votes
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान