• Download App
    तुमचे व्हॉट्स अँप होऊ शकते हॅक? दिल्लीत व्हॉटस अँप हॅक करून ब्लॅकमेल केल्याची घटना | Can your WhatsApp be hacked? WhatsApp got hacked and blackmailing in Delhi

    तुमचे व्हॉट्स अँप होऊ शकते हॅक? दिल्लीत व्हॉटस अँप हॅक करून ब्लॅकमेल केल्याची घटना

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : सायबर क्राइमच्या बऱ्याच केसेस तुम्ही ऐकल्या असतील. पण व्हॉट्सअॅप हॅक करून पैशासाठी ब्लॅकमेल करण्याची केस तुम्ही कधी ऐकलीय का? तर दिल्ली पोलिसांना सुद्धा या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे. दिल्ली पोलिसांनी 33 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. तो लोकांचे फोन हॅक करून पैशासाठी ब्लॅकमेल करायचा. केमेलम इम्मॅन्युएल अनिवेतालु असे या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.

    Can your WhatsApp be hacked? WhatsApp got hacked and blackmailing in Delhi

    सदर व्यक्ती लोकांच्या फोनवर मालवेअर लिंक पाठवायचा. त्या नंतर मोबाइलचा असेस मिळाल्यानंतर व्हॉट्सअॅपसारखे मेसेजिंग अँपस वापरून लोकांकडे पैश्याची मागणी करायचा.


    CYBER CRIME : केंद्र सरकारचा Fake News तपासणी करणारा विभागही cyber crime च्या विळख्यात ; PIB ची बनावट वेबसाईट उघड


    दिल्ली पोलिसांनी याआधी मालवेअर व्हायरसद्वारे ई मेल अकाउंट हॅक करून सायबर क्राइम केलेल्या केसेस ऐकल्या होत्या. पण मालवेअर लिंक एखाद्या मोबाइलचा रिमोट असेस मिळविण्यासाठी वापरण्याची ही पहिलीच केस दिल्ली पोलिसांनी पाहिली आहे. असे डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलिस के पी एस मल्होत्रा यांनी सांगितले.

    मल्होत्रा म्हणतात, अटक करण्यात आलेला नागरीक दिल्ली आणि बंगळुरूमधून काम करायचा. लोकांचे फोन हॅक करू त्यांच्याकडे पैशाची मागणी करणे, त्यांच्या मोबाइलमधील डेटाच्या आधारावर त्यांना ब्लॅकमेल करणे असे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत.

    Can your WhatsApp be hacked? WhatsApp got hacked and blackmailing in Delhi

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मणिपूरमध्ये सीआरपीएफचे 2 जवान शहीद; कुकी अतिरेक्यांनी मैतेई गावात सेंट्रल फोर्स पोस्टवर बॉम्ब फेकले, 2 जवान जखमी

    सुप्रीम कोर्टात याचिका- NOTA ला जास्त मते पडल्यास निवडणूक रद्द करावी; निवडणूक आयोगाला नोटीस

    काश्मीरच्या सोपोरमध्ये 2 दहशतवादी ठार, 2 जवान जखमी; 2 दिवसांपासून ऑपरेशन सुरू