• Download App
    D. K. Shivkumar D. K. शिवकुमारांची शपथविधी पूर्वी काल गांधी परिवार स्तुती; आज सर्वपक्षीय ज्येष्ठांकडे आशीर्वाद फेरी!!; पण हे सगळे कशासाठी??

    D. K. शिवकुमारांची शपथविधी पूर्वी काल गांधी परिवार स्तुती; आज सर्वपक्षीय ज्येष्ठांकडे आशीर्वाद फेरी!!; पण हे सगळे कशासाठी??

    नाशिक : D. K. शिवकुमार यांची शपथविधी पूर्वी गांधी परिवार स्तुती; आज सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांकडे आशीर्वाद फेरी!!, असे चतुराईचे राजकारण शिवकुमार यांनी साधून घेतले.

    डी. के. शिवकुमार आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. पण काल त्यांनी गांधी परिवाराची अफाट स्तुती केली. 1985 मध्ये इंदिरा गांधींचे नाव रेस्टॉरंटला देण्यापासून आपला राजकीय प्रवास सुरू झाला. या राजकीय प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर आपण गांधी परिवाराशी कायम निष्ठा ठेवली. राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या भरपूर प्रेम दिले. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या त्या आपण गांधी परिवाराशी असलेल्या निष्ठेने पार पाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री पद सुद्धा गांधी परिवारामुळेच आपल्याला मिळाले. ते सुद्धा आपण निष्ठेने सांभाळू, अशी ग्वाही शिवकुमार यांनी काल दिली.

    – ज्येष्ठ नेत्यांकडे आशीर्वाद फेरी

    पण शिवकुमार तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आज सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांकडे आशीर्वाद फेरी काढली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी आज सिद्धरामय्या यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांना नमस्कार करून आणि त्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांना आशीर्वाद दिले. त्याचबरोबर जी परमेश्वरन हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी आधीच जाहीर करून टाकले.

    त्यानंतर शिवकुमार यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. याच दरम्यान कर्नाटकचे भावी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरम यांनी भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली. अर्जुन मुंडा यांनी जी परमेश्वरन यांचा शाल पांघरून सत्कार केला.

    त्यानंतर शिवकुमार यांनी माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

    – दीर्घकालीन राजकीय वाटचालीसाठी

    शिवकुमार यांनी एकीकडे गांधी परिवाराची अफाट स्तुती करून काँग्रेस मधून आपले स्थान बळकट केलेच, पण त्याच वेळी कर्नाटकचे राज्य दीर्घकाळ हातात टिकून राहावे यासाठी सर्वपक्षीय जेष्ठ नेत्यांचे आशीर्वाद सुद्धा घेण्याची चतुराई दाखविली. एरवी गांधी परिवाराने शिवकुमार यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नसती तर त्यांनी गांधी परिवाराची एवढी आखाड स्तुती केली असती का??, हा कळीचा सवाल आहे. पण त्याच वेळी शिवकुमार यांनी सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या दीर्घकालीन राजकीय वाटचालीचीच चुणूक आज दाखवून दिली.

    D. K. Shivkumar’s swearing-in ceremony in praise of the Gandhi family of the East

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Carpool togather : मोदी सरकारचे तीन मंत्री एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना!!

    Opposition : ८ जूनला दिल्लीत विरोधकांची महासभा; राहुल, ममता, अखिलेश, उद्धव एकाच मंचावर, भाजपविरोधी रणनितीवर चर्चा

    Gujarat ST bus : गुजरातमध्ये दोन एसटी बसेसची भीषण धडक; एक बस पेटली, ७ जणांचा मृत्यू, ४० हून अधिक प्रवासी जखमी