जाणून घ्या आतापर्यंत किती नुकसान झालं? उड्डाणे आणि गाड्या सर्व रद्द
विशेष प्रतिनिधी
Cyclone Dana दाना चक्रीवादळाचा कहर सुरूच आहे. दाना चक्रीवादळ ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धामरा येथे रात्री 12:45 वाजता धडकले. लँडफॉल दरम्यान त्याचा वेग ताशी 120 किमी होता. सध्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 100 ते 120 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे.Cyclone Dana
दाना चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर ओडिशातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग तुटले आहेत. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, किनारपट्टीच्या भागात आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दाना चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सर्व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासनाच्या पथके वादळग्रस्त भागात तैनात आहेत. खबरदारी म्हणून ओडिशातील 14 जिल्ह्यातील 10 लाख लोकांना हलवण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये 3.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. वादळामुळे बंगाल आणि ओडिशामध्ये 300 उड्डाणे आणि 552 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
ओडिशाच्या धामरा आणि भद्रकमध्ये जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. परिसरातील झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. स्थानिक लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणामध्ये दाना चक्रीवादळावर सतत लक्ष ठेवले जात आहे. राज्य आपत्ती पथके वादळाच्या प्रभावावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्य अधिकाऱ्यांसह वादळाच्या प्रभावाचा आढावा घेत आहेत.
चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि यूपीमध्ये दिसून येईल. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. इतर राज्यातही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या राज्यांना अलर्ट जारी केला आहे.
Cyclone Dana hits Odisha West Bengal
महत्वाच्या बातम्या
- Congress : राजस्थानमध्ये काँग्रेसची दोन पक्षांसोबतची युती संपुष्टात!
- Rajesh Pandey राजेश पांडे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती
- Maharashtra Elections : पवारांनी दिले आव्हान, तरी नाही माघार; “हरियाणा” रिपीट करायला मोदी 8 दिवस महाराष्ट्रात!!
- Delhi Jamia University : दिल्लीच्या जामिया विद्यापीठात दोन गटांमध्ये वाद; पॅलेस्टाईन झिंदाबादच्या घोषणा दिल्या, विद्यार्थिनींवर अभद्र कमेंट