• Download App
    देवाच्या नावावर क्रूरता, हिंदू मुलाची मुस्लिमांकडून हत्या झाल्यावर कंगना रनौतचा संताप|Cruelty in the name of God, Kangana Ranaut's anger after the murder of a Hindu boy by Muslims

    देवाच्या नावावर क्रूरता, हिंदू मुलाची मुस्लिमांकडून हत्या झाल्यावर कंगना रनौतचा संताप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देवाच्या नावावर अविश्वसनीय क्रूरता सुरू आहे. किशनच्या पोस्टमुळे दुखावल्याचं यांना देवाने सांगितलं होतं का? जो एका फेसबुक पोस्टने दुखावतो. जो देव माफी आणि पश्चाताप स्वीकारत नाही, अशा देवाची पुजा का करावी?, असा सवाल अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे.Cruelty in the name of God, Kangana Ranaut’s anger after the murder of a Hindu boy by Muslims

    गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुका शहरात भरवाड समाजाच्या एका हिंदू तरुणाची हत्या झाल्यानं तणावाचं वातावरण आहे. किशन भरवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. मृत किशन भरवाड हा सोशल मीडियावर खूप सक्रिय होता.



    काही दिवसांपूर्वी त्याच्या एका फेसबुक पोस्टमुळे मुस्लीम समाजातील लोकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात किशनने माफी मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत किशन भरवाडला अटक केली होती आणि काही दिवसांनी किशनला जामिनावर सोडलं होतं.

    मात्र, एके दिवशी तो काही कामानिमित्त दुचाकीवरून घरातून बाहे पडला होता. त्यावेळी दुचाकीस्वारांनी पाठलाग करत मोळवाडा मोर परिसरात पोहोचताच त्याच्या दोन राऊंड गोळीबार करण्यात आला. पहिला निशाणा चुकला मात्र दुसरी गोळी थेट किशनला लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

    मृत किशन भरवाडला अवघी २० दिवसांची मुलगी आहे. त्याला न्याय मिळावा म्हणून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, तर धंधुका शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या हत्या प्रकरणात गुजरात एटीएसने दर्ग्यात शोधमोहीम राबवली.

    याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना आणि त्यांना गोळ्या पुरविणाऱ्या अहमदाबादच्या जमालपूर भागातील मौलानी यांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

    या प्रकरणी अहमदाबादच्या मौलानाची चौकशी केल्यानंतर दिल्ली आणि मुंबईच्या मौलानाचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीनंतर गुजरात एटीएसची टीम दिल्ली आणि मुंबईला रवाना झाली आहे.

    Cruelty in the name of God, Kangana Ranaut’s anger after the murder of a Hindu boy by Muslims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही