• Download App
    कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १२५ डॉलरवर। Crude oil At 125 dollar a barrel

    कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १२५ डॉलरवर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. १२व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. खार्किवमधील अनेक निवासी भागांवरही हल्ले झाले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांचे शिष्टमंडळ आज तिसऱ्यांदा चर्चा करणार आहेत. यापूर्वी झालेल्या चर्चेत सुरक्षित कॉरिडॉरवर एकमत झाले होते. आज होणाऱ्या चर्चेत युद्धविरामावर चर्चा होऊ शकते. Crude oil At 125 dollar a barrel

    कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १२५ डॉलरवर पोहोचला, युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. बातम्यांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १० डॉलरने वाढून १२५ डॉलरवर पोहोचली आहे.



    पंतप्रधान मोदी आज झेलेन्स्की यांच्याशी बोलणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदी भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि युद्ध टाळण्यासाठी फोनवर चर्चा करणार आहेत.

    दरम्यान, कीवमध्ये सैनिकांच्या गोळीबारात जखमी झालेला भारतीय विद्यार्थी हरजोत सिंग लवकरच भारतात परतणार आहे. गोळी लागल्याने हरजोतचा पासपोर्टही हरवला असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंह यांनी केले आहे. मात्र, मंगळवारी तो भारतात परतणार आहे.

    Crude oil At 125 dollar a barrel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Golden Temple : सुवर्ण मंदिरावर पुन्हा बॉम्ब हल्ल्याची धमकी; 24 तासांत आणखी एक ई-मेल

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार