• Download App
    गरज पडल्यास एलओसी पार करू; युद्धासाठी तयार राहा; कारगिल विजयदिनी संरक्षणमंत्री राजनाथ यांचा इशारा|Cross the LoC if necessary; Prepare for battle; Defense Minister Rajnath's Warning on Kargil Victory Day

    गरज पडल्यास एलओसी पार करू; युद्धासाठी तयार राहा; कारगिल विजयदिनी संरक्षणमंत्री राजनाथ यांचा इशारा

    वृत्तसंस्था

    द्रास (लडाख ) : कारगिल युद्धात आम्ही लाइन ऑफ कंट्रोल (एलओसी) पार केली नव्हती. याचा अर्थ असा नाही की आम्ही एलओसी पार करू शकत नव्हतो. आम्ही असे करू शकत होतो, करू शकतो आणि गरज पडल्यास तसे करूही, असा इशारा २४व्या कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ते म्हणाले, जनतेने युद्धासाठी तयार राहिले पाहिजे. अशा वेळी सैनिकांचे समर्थन करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.Cross the LoC if necessary; Prepare for battle; Defense Minister Rajnath’s Warning on Kargil Victory Day



    संरक्षणमंत्र्यांनी द्रासमधील कारगिल वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही | दलांचे प्रमुखही उपस्थित होते. त्यांनीही कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली पाहिली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी द्रासमधील ‘हट ऑफ रिमेंबरन्स’ संग्रहालयाची पाहणी केली. या संग्रहालयात कारगिल युद्धातील लष्कराच्या शौर्य आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

    Cross the LoC if necessary; Prepare for battle; Defense Minister Rajnath’s Warning on Kargil Victory Day

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालय म्हणाले – पत्नी मोलकरीण नाही, जीवनसाथी आहे:घटस्फोटाच्या प्रकरणात म्हटले – जेवण न बनवणे क्रूरता नाही, घरकाम पतीचीही जबाबदारी

    ECI : निवडणुकीच्या जाहिरातींसाठी पक्षांना प्रमाणपत्र घ्यावे लागेल; निवडणूक आयोगाचे निर्देश

    LPG Tankers : द फोकस एक्सप्लेनर : देशाला दरमहा ३० LPG टँकरची गरज; त्यापैकी ६ होर्मुझमध्ये अडकले, गॅस पुरवठ्याचे पुढे काय?