सध्या आयपीएलच्या 14 व्या पर्वाला सुरुवात झाल्यामुलं सगळीकडंच क्रिकेटमय वातावरण तयार झालं आहे. क्रिकेट हा भारतातील अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळं क्रिकेटपटुंच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. परिणामी क्रिकेटपटुंचं (Cricketers) खासगी जीवन किंवा त्यांच्याबाबतच्या गोष्टी जाणून घेण्यात कायमच चाहत्यांना रस असतो. क्रिकेटपटुंच्या पत्नीही अनेकदा त्यामुळं चर्चेत असतात. काही क्रिकेटपटू असेही आहेत ज्यांना त्यांचे जोडीदारच मुळात क्रिकेटच्या मैदानावर भेटले आहेत. जगात अव्वल क्रमांकावर असलेला भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहदेखील नुकताच विवाह बंधनात अडकला. बुमराहनं स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्याशी विवाह केलाय. त्यामुळं या विवाहाची बरीच चर्चाही झाली. पण बुमराहनंच नव्हे तर इतरही काही क्रिकेटपटुंनी स्पोर्ट्स अँकरशी विवाह केलाय. त्यांच्याबाबत आपण जाणून घेऊयात. Cricketers who married with sport anchors
हेही वाचा –