हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : एकदिवसीय विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून सुरू झाला. यावेळी भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा भारतीय संघाच्या विशेष करून पाकिस्तानसोबत होणाऱ्या मॅचकडे लागल्या आहेत. Cricket World Cup Special Vande Bharat will be run for India Pakistan match
भारतीय संघाने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेला आजपासून म्हणजेच ८ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने सुरुवात केली आहे. यानंतर ११ ऑक्टोबरला भारतीय संघ अफगाणिस्तानशी भिडणार आहे.
१४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार आहे, ज्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी भारतीय रेल्वेही क्रिकेट चाहत्यांना भेट देणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
X, YouTube आणि Telegram ला सरकारी नोटीस; बाल लैंगिक शोषणासंबंधीचा कंटेंट लगेच हटवा, अन्यथा कारवाई
भारत-पाकिस्तान सामन्याला तिकिटांपासून हॉटेल्सपर्यंत मोठी मागणी आहे. अहमदाबादमध्ये प्रेक्षक सातत्याने विमान तिकीट आणि हॉटेल्स बुक करत आहेत. अशा परिस्थितीत काही प्रेक्षकांना सामन्यापूर्वी अहमदाबाद गाठणे कठीण झाले आहे. प्रेक्षकांची ही समस्या सोडवण्यासाठी भारतीय रेल्वे एक मोठी घोषणा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी भारतीय रेल्वे अनेक विशेष वंदे भारत ट्रेन चालवणार आहे, जेणेकरून चाहत्यांना वेळेवर अहमदाबादला पोहोचता येईल. असे झाले तर प्रेक्षकांचेही बरेच पैसे वाचतील.
Cricket World Cup Special Vande Bharat will be run for India Pakistan match
महत्वाच्या बातम्या
- बंगळुरूमध्ये भीषण दुर्घटना, फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू
- Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ३० मिनिटांत ३ शक्तिशाली भूकंप, १४ मृत्यू, ७८ जखमी
- दहशतवादी रिझवान अश्रफचे ‘सपा’ नेत्याशी आढळले कनेक्शन, तपास यंत्रणांनी छापेमारी सुरू केली
- Asian Games 2023 : भारताने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास, आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक