• Download App
    Court dismissed Prime Minister of Thailand कोर्टाने थायलंड

    Thailand : …म्हणून कोर्टाने थायलंडच्या पंतप्रधानांची केली हकालपट्टी!

    Thailand

    जाणून घ्या का घेतला हा कठोर निर्णय?


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : थायलंडमधून ( Thailand ) मोठी बातमी समोर आली आहे. थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना पदावरून हटवण्यात आले आहे. तेथील सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली आहे. नैतिक मूल्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रेथा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे थायलंडचे राजकारण चांगलेच तापले आहे. आठवड्याभरापूर्वीच न्यायालयाने प्रमुख विरोधी पक्षही विसर्जित करण्याचे आदेश दिले होते.



    वास्तविक, पंतप्रधान श्रेथा यांनी अलीकडेच त्यांच्या मंत्रिमंडळात पिचित चुएनबान नावाच्या व्यक्तीची नियुक्ती केली होती. न्यायालयीन अधिकाऱ्याला लाच दिल्याबद्दल त्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यात आले. न्यायालयाने पंतप्रधानांचा हा निर्णय नैतिकतेचा भंग मानला. याच कारणामुळे घटनात्मक न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून श्रेथा यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ केले.

    मिळालेल्या माहितीनुसार, नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने ५:४ मतांनी श्रेथा यांना हटवण्याचा निर्णय दिला. संसदेद्वारे नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत वर्तमान मंत्रिमंडळ काळजीवाहू तत्त्वावर काम करेल. नवा पंतप्रधान केव्हा निवडला जाईल याबाबत सध्या न्यायालयाने कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.

    Court dismissed Prime Minister of Thailand

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Awas Yojana 2026 : प्रधानमंत्री आवास योजना 2026: स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! पात्रता, अर्ज प्रक्रिया, अनुदान आणि संपूर्ण माहिती

    Maharashtra Legislative : द फोकस एक्सप्लेनर : विधान परिषदेत जिंकून नेमके काय मिळते? महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणावर त्याचा कसा परिणाम होतो?

    MPSC : एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! ‘निपुण सेतू’ला मंजुरी; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मिळणार नोकरीची नवी संधी