जाणून घ्या का घेतला हा कठोर निर्णय?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : थायलंडमधून ( Thailand ) मोठी बातमी समोर आली आहे. थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना पदावरून हटवण्यात आले आहे. तेथील सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली आहे. नैतिक मूल्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रेथा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे थायलंडचे राजकारण चांगलेच तापले आहे. आठवड्याभरापूर्वीच न्यायालयाने प्रमुख विरोधी पक्षही विसर्जित करण्याचे आदेश दिले होते.
वास्तविक, पंतप्रधान श्रेथा यांनी अलीकडेच त्यांच्या मंत्रिमंडळात पिचित चुएनबान नावाच्या व्यक्तीची नियुक्ती केली होती. न्यायालयीन अधिकाऱ्याला लाच दिल्याबद्दल त्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यात आले. न्यायालयाने पंतप्रधानांचा हा निर्णय नैतिकतेचा भंग मानला. याच कारणामुळे घटनात्मक न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून श्रेथा यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ केले.
मिळालेल्या माहितीनुसार, नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने ५:४ मतांनी श्रेथा यांना हटवण्याचा निर्णय दिला. संसदेद्वारे नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत वर्तमान मंत्रिमंडळ काळजीवाहू तत्त्वावर काम करेल. नवा पंतप्रधान केव्हा निवडला जाईल याबाबत सध्या न्यायालयाने कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.
Court dismissed Prime Minister of Thailand
महत्वाच्या बातम्या
- Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल!
- Saket Gokhale : ‘टीएमसी’ खासदार साकेत गोखले यांच्या अडचणीत वाढ!
- Arvind Kejriwal : न्यायालयाकडून अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ!
- S Jaishankar :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत एस जयशंकर यांचे वक्तव्य, म्हणाले…