• Download App
    Patna Blast Case: नऊ आरोपी दोषी आणि एकाची सुटका, आठ वर्षांपूर्वी मोदींच्या सभेत झाले होते बॉम्बस्फोट। Court Decision Today In Gandhi Maidan Blast Case Patna Gandhi Maidan Serial Blasts 2013 At Narendra Modi Rally

    Patna Blast Case: नऊ आरोपी दोषी आणि एकाची सुटका, आठ वर्षांपूर्वी मोदींच्या सभेत झाले होते बॉम्बस्फोट

    बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या (पाटणा) विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या अंतर्गत न्यायालयाने 10 पैकी 9 आरोपींना दोषी ठरवले आहे, तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. Court Decision Today In Gandhi Maidan Blast Case Patna Gandhi Maidan Serial Blasts 2013 At Narendra Modi Rally


    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या (पाटणा) विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या अंतर्गत न्यायालयाने 10 पैकी 9 आरोपींना दोषी ठरवले आहे, तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

    आठ वर्षांपूर्वी 2013 मध्ये (27 ऑक्टोबर) या दिवशी पाटणा येथील गांधी मैदानात पंतप्रधान मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात सात जणांना आपला जीव गमवावा लागला तर 90 जण जखमी झाले होते. मात्र, या स्फोटांना न जुमानता रॅलीही झाली आणि नरेंद्र मोदींनी संबोधितही केले. या प्रकरणात इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम) नऊ संशयितांना आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या (सिमी) एकाला आरोपी करण्यात आले होते.

    अल्पवयीन आरोपींची निर्दोष मुक्तता

    नुमान अन्सारी, हैदर अली ऊर्फ ​​ब्लॅक ब्युटी, मोहम्मद मुजीबुल्ला अन्सारी, उमर सिद्दिकी, अझरुद्दीन कुरेशी, अहमद हुसेन, फकरुद्दीन, मोहम्मद इफ्तेखार आलम आणि एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत. 12 ऑक्‍टोबर 2017 रोजी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.



    इंडियन मुजाहिद्दीनने घडवले बॉम्बस्फोट

    हे स्फोट इंडियन मुजाहिद्दीनने केले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. याप्रकरणी एनआयएने 7 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा होण्याची शक्यता आहे.

    18 बॉम्ब केले होते प्लांट

    बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅलीच्या दिवशी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 18 बॉम्ब प्लांट करण्यात आले होते. यातील पाच बॉम्ब रेल्वे स्थानक परिसरात होते, त्यातील एक स्फोट झाला तर एक निकामी करण्यात आला. पोलिसांना स्टेशन परिसरातून आणखी तीन बॉम्ब सापडले.

    Court Decision Today In Gandhi Maidan Blast Case Patna Gandhi Maidan Serial Blasts 2013 At Narendra Modi Rally

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार