• Download App
    जम्मू - काश्मीरमधील कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन भत्ता ;17,000 जणांचा फायदा|Corona Warriors in Jammu and Kashmir Incentive allowance

    जम्मू – काश्मीरमधील कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन भत्ता ;17,000 जणांचा फायदा

    वृत्तसंस्था

    जम्मू : जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कोविड -19 वॉरियर्सना खास आर्थिक प्रोत्साहन मंजूर केले.Corona Warriors in Jammu and Kashmir Incentive allowance

    एका निवेदनानुसार, या निर्णयाचा निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल / नर्सिंग स्टाफ, ड्रायव्हर्स आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांसह 17,000 हून अधिक कोरोना योद्ध्यांना फायदा होईल.



    निवासी डॉक्टर, पीजी आणि वैद्यकीय अधिका-यांना दरमहा 10,000 रुपये, नर्सिंग व पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना 7000 रुपये आणि चालक, सफाई कामगार आणि सेवादारांना दरमहा 5000 रुपये प्रोत्साहन भत्ता म्हणून दिले जातील.

    त्यांचा कार्यकाळ सुरुवातीला 3 महिन्यांचा असेल. आणि मे 2021 पासून त्याचा मोबदला दिला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. कोविड -19 प्रकरणातील वाढ आणि या महत्त्वपूर्ण टप्प्यावर उपलब्ध वैद्यकीय सेवांचा आढावा उपराज्यपाल यांनी घेतला.

    एसकेआयएम, सौरा, श्रीनगर / बेमिना येथे कार्यरत असलेले प्राध्यापक, सल्लागार आणि डॉक्टरांना 1 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढही दिली. ते मे ते नोव्हेंबर या कालावधीत निवृत्त होणार होते. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये 32,421 कोरोनाची सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत एकूण 1,48,695 जण बरे झाले आहेत.

    Corona Warriors in Jammu and Kashmir Incentive allowance

    महत्त्वाची बातमी

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार