Corona Updates India : देशातील कोरोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दुसऱ्यांदा देशात एकाच दिवसात एक लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागच्या 24 तासांत 1,15,736 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कोरोनातून 59,856 रुग्ण बरे झाले आहेत. यापूर्वी 4 एप्रिल रोजी एक लाख तीन हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. Corona Updates India records Worlds Highest numbers corona patients in 24 hours
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दुसऱ्यांदा देशात एकाच दिवसात एक लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागच्या 24 तासांत 1,15,736 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कोरोनातून 59,856 रुग्ण बरे झाले आहेत. यापूर्वी 4 एप्रिल रोजी एक लाख तीन हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले होते.
देशातील कोरोनाची स्थिती
एकूण कोरोना रुग्ण – 1 कोटी 28 लाख 1 हजार 785
एकूण बरे झालेले – 1 कोटी 17 लाख 92 हजार 135
एकूण सक्रिय रुग्ण – 8 लाख 43 हजार 473
एकूण मृत्यू – एक लाख 66 हजार 177
एकूण लसीकरण – 8 कोटी 70 लाख 77 हजार 474
एक काळ असा होता की जेव्हा देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागले होते. यावर्षी 1 फेब्रुवारीला 8,635 नवीन कोरोना केसेस दाखल झाल्या. या वर्षातला एका दिवसातला हा सर्वात कमी आकडा होता. देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या एकूण 25 कोटी 14 लाख चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी काल 12 लाख चाचण्या घेण्यात आल्या.
महाराष्ट्रात पुन्हा 50 हजारांहून अधिक रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येने तीन दिवसांत दुसऱ्यांदा 50 हजारांचा आकडा ओलांडला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येने 31 लाखांचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे, देशात सर्वात जास्त 80 लाख जणांचे लसीकरण महाराष्ट्रात झालेले आहे. 4 एप्रिल रोजी 57,074 नवीन रुग्ण आढळले. दोन दिवसांनंतर, राज्यात संसर्ग होण्याच्या घटनांची संख्या 47,288 वरून 55,469 वर गेली आहे, राज्यात एकूण रुग्णसंख्या 31,13,354 वर पोहोचली आहे. एक दिवस आधी राज्यात मृत्यूची संख्या 155 होती, जी 297 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील एकूण मृत्यूंची संख्या आता वाढून 56,330 झाली आहे.
Corona Updates India records Worlds Highest numbers corona patients in 24 hours
महत्त्वाच्या बातम्या
- RBI Credit Policy : व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, RBIचा 10.5% जीडीपी ग्रोथचा अंदाज
- वसुली प्रकरणात देशमुखांच्या बचावात उतरली शिवसेना, विरोधकांवर ‘सामना’तून टोलेबाजी, येडियुरप्पांचं दिलं उदाहरण
- आमने-सामने : मोईन अलीबाबत लेखिका तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त ट्विट जोफ्रा आर्चर भडकला
- दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी रेड्डीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ यांची मागणी
- एनआयएने केले नाट्यरूपांतर, वाझेची काढली कळवा ते सीएसटी लोकलवारी