• Download App
    राजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी Corona test will be done in Rajasthan from a private lab for Rs 350

    राजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी

    कोरोनाचा संशय असलेल्या जास्तीत जास्त लोकांनी चाचणी करून घ्यावी यासाठी राजस्थान सरकारने आरटी-पीसीआर चाचणीचे खासगी लॅबमधील दर साडेतीनशे रुपये करण्याचे आदेश दिले आहेत. देशात सर्वात स्वस्त कोरोना चाचणी राजस्थानात होत असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. Corona test will be done in Rajasthan from a private lab for Rs 350


    विशेष प्रतिनिधी 

    जयपूर : कोरोनाचा संशय असलेल्या जास्तीत जास्त लोकांनी चाचणी करून घ्यावी यासाठी राजस्थान सरकारने आरटी-पीसीआर चाचणीचे खासगी लॅबमधील दर साडेतीनशे रुपये करण्याचे आदेश दिले आहेत. देशात सर्वात स्वस्त कोरोना चाचणी राजस्थानात होत असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

    राजस्थान मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रशासनाला ऑक्सिजनचापुरवठा सुरळित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.



    राजस्थानमध्ये शनिवारी आत्तापर्यंतची सर्वात जास्त कोरोना रुग्णांची वाढ झाली. नऊ हजार शेहचाळीस नवे कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या चार लाख चार हजार ३५५ झाली आहे. आत्तापर्यंत ३,१०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    अशोक गेहलोत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करणे गरजेचे आहे. त्यामुळे राजस्थान सरकारने विकेंड कर्फ्यूची घोषणा केली होती.

    Corona test will be done in Rajasthan from a private lab for Rs 350

    Related posts

    ओवैसींच्या चिंतेत भर, भाजपच्या माधवी लता मुस्लिमांमध्येही प्रचंड लोकप्रिय, हैदराबादेत आव्हान

    शिवराज सिंह चौहान यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हं!

    2 – 0 आघाडी : फुटबॉलच्या परिभाषेत पंतप्रधान मोदींनी कोल्हापूरकरांना समजावला विजयाचा फॉर्म्युला!!