चेन्नईजवळ असलेल्या वंडालूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयात कोरोनाने एका सिंहिनीचा मृत्यू झाला आहे. प्राणिसंग्रहालयातील ९ वर्षांच्या निला नावाच्या सिंहिनीचा ३ जूनला मृत्यू झाला. निला सिंहिनीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. ती पॉझिटिव्ह होती. एक दिवसापूर्वीच तिच्या नाकातून स्त्राव येत होता, अशी माहिती देण्यात आली आहे.Corona kills lioness in Chennai, 9 out of 11 lions corona positive
विशेष प्रतिनिधी
चेन्नई: चेन्नईजवळ असलेल्या वंडालूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयात कोरोनाने एका सिंहिनीचा मृत्यू झाला आहे. प्राणिसंग्रहालयातील ९ वर्षांच्या निला नावाच्या सिंहिनीचा ३ जूनला मृत्यू झाला. निला सिंहिनीला कोरोनाचा संसर्ग झाला होता.
ती पॉझिटिव्ह होती. एक दिवसापूर्वीच तिच्या नाकातून स्त्राव येत होता, अशी माहिती देण्यात आली आहे.प्राणिसंग्रहालयातील ११ पैकी ९ सिंहांचा करोना चाचणी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये विष्टा आणि स्वॅबची चाचणी भोपाळमध्ये करण्यात आली होती.
त्यांच्या रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे पाठवण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंहांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.
वाघ आणि सिंहामध्ये करोनाचा संसर्ग हा सर्वप्रथम बार्सिलोना (स्पेन) आणि अमेरिकेतील ब्रोंक्स प्राणिसंग्रहालयात आढळून आला होता. संसगार्ची लक्षणं ही २६ मे रोजी समोर आली होती.
प्राणिसंग्रहालयातील अॅनिमल हाउस १ मध्ये ठेवण्यात आलेल्या ५ सिंहांमध्ये एनोरेक्सिया (भूक न लागणं) आणि अधून-मधून खोकला येत असल्याची लक्षणं दिसली.
सिंहांच्या रक्ताचे नमुने हे तामिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात पाठण्यात आले, असं प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आलं.
नाकातील स्वॅब, रेक्टल स्वॅब आणि ११ सिंहांच्या विष्टेचे नमुने भोपाळमधील संस्थेला पाठवले गेले.
ही संस्था करोना व्हायरसची चाचणीसाठी अधिकृत असलेल्या ४ नामांकित संस्थांपैकी एक आहे. प्राणिसंग्रहालयातील सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
हैदराबादमधील प्राणिसंग्रहालयाती ८ सिंह करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. सिंहांना करोना संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना होती. यानंतर काही दिवसांनी उत्तर प्रदेशातील इटावामध्ये एक सिंह करोना पॉझिटिव्ह आढळला होता.
Corona kills lioness in Chennai, 9 out of 11 lions corona positive
महत्त्वाच्या बातम्या
- लस घोटाळ्याच्या आरोपांनंतर पंजाब सरकारचा यू-टर्न, खासगी रुग्णालयांना लस विक्रीचा आदेश केला रद्द
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक
- पंजाबात व्हॅक्सिन घोटाळा!, कोव्हॅक्सिन 400 रुपयांना घेऊन खासगी रुग्णालयांना 1096 रुपयांना विक्री केल्याचा आरोप
- केरळ सरकारचे 20 हजार कोटींचे कोविड पॅकेज, आरोग्य सेवा – लसीकरणावर लक्ष केंद्रित, कोणताही नवीन कर नाही
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून एल्गार, विनायक मेटेंची माहिती