विशेष प्रतिनिधी
कोडागू : कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यातील निवासी शाळा जवाहर नवोदय विद्यालयमध्येजवळपास 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 10 मुली आणि 22 मुलांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची एका आठवड्यापूर्वी कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. या गोष्टींमुळे कर्नाटकमध्ये कोरोनाची चिंता मात्र वाढलेली आहे.
Corona infection in 32 students at a school in Karnataka
विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शाळेत एकूण 270 विद्यार्थी आहेत. 32 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी एनडीटीव्ही सोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून चिंता करण्याचे कोणतेही कारण नाहीये. शाळेतील सर्व परिसर सॅनिटायझर करण्यात आला असून योग्य ती सर्व काळजी शाळेतर्फे घेतली जात आहे. फक्त यामुळे शाळेच्या टाइमटेबल बिघडले आहे अशी चिंता शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली आहे.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर शाळा अधिकारी शाळेत पोहोचले.
Corona infection in 32 students at a school in Karnataka
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन