• Download App
    Corona Infection : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना करोनाची लागण Corona Infection Five judges of the Supreme Court are infected with Corona

    Corona Infection : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना करोनाची लागण

     समलिंगी विवाह प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीशही पॉझिटिव्ह

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशात करोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. कोविडच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशही याच्या कचाट्यात आले आहेत. या पाच न्यायाधीशांपैकी एक असेही आहेत जे समलिंगी विवाह प्रकरणाची सुनावणी करत आहेत. Corona Infection Five judges of the Supreme Court are infected with Corona

     मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनापीठाच्या न्यायाधीशांना करोनाची लागण झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह प्रकरणाची सोमवारी सुनावणी होणार नाही. घटनापीठाच्या न्यायाधीशांना करोनाची लागण झाल्यामुळे खंडपीठाचे इतर न्यायाधीशही चिंतेत असून त्यांच्या प्रकृतीबाबत जागरुक आहेत.

    या न्यायाधीशांना करोनाची लागण  –

    मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश एस रवींद्र भट, न्यायाधीश अनिरुद्ध बोस, न्यायाधीश जेबी परडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांना करोनाची लागण झाली आहे. न्यायाधीश एस. रवींद्र भट हे समलिंगी विवाह प्रकरणात घटनापीठाचे सदस्य आहेत. त्यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचवेळी, न्यायाधीश सूर्यकांत एका आठवड्यापूर्वी करोनामधून बरे झाले आहेत.

    Corona Infection Five judges of the Supreme Court are infected with Corona

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती